“खरी कमाई – आनंद नगरी” उपक्रमात उसळली उत्साहाची लाट; जिल्हा परिषद शाळेत ज्ञान–अनुभवाची जत्रा 

“खरी कमाई – आनंद नगरी” उपक्रमात उसळली उत्साहाची लाट; जिल्हा परिषद शाळेत ज्ञान–अनुभवाची जत्रा

 

 

दत्तात्रय काटोले

 

सोयगाव | तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत “दशसूत्री” व “आनंददायी शिक्षण” उपक्रमांतर्गत आयोजित “खरी कमाई – आनंद नगरी” हा उपक्रम शनिवारी, दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे, केंद्रप्रमुख फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्याध्यापक किरणकुमार पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

 

शाळेच्या प्रांगणात पालक, गावकरी, माजी विद्यार्थी आणि मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळाली. काही क्षणांसाठी शाळेचे मैदान जणू एखाद्या जत्रेत परिवर्तित झाल्याचे भास विद्यार्थ्यांच्या उत्साहातून दिसून आले.

 

विद्यार्थ्यांनी तयार केलेली विक्री-केंद्रे, कला-दालन, खेळ स्टॉल, खाद्यपदार्थ, हातगुंतीच्या वस्तू, सेवा-केंद्रे, तसेच तिकीट पद्धतीची आर्थिक देवाणघेवाण या उपक्रमांना पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुलांची गणिती व्यवहारकुशलता, पैशाचे व्यवस्थापन, संवाद कौशल्य, उद्यमशीलता आणि आत्मविश्वास पाहून उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.

 

कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली —

बँक ऑफ महाराष्ट्र सोयगाव शाखा व्यवस्थापक धीरज भुरे, केंद्रप्रमुख फिरोज तडवी, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा राधाबाई सोनवणे, सदस्य अण्णा वाघ, समिती सदस्य रंगनाथ लोखंडे, समाजसेवक कृष्णा पाटील, माजी विद्यार्थी संघ सदस्य राजू कुडके, समाजसेवक दत्त रोकडे, नगरसेवक बंटी काळे, समाजसेवक राजेंद्र दुतोडे, समाजसेवक अंकुश पगारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचे महत्व अधिक वाढले.

 

या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी व्यवहारातील गणित, सहकार्य, जवाबदारी, उद्यमशीलता याचे प्रत्यक्ष ज्ञान घेतले. पालकांनी मुलांच्या कल्पकतेचे आणि परिश्रमाचे मनापासून कौतुक केले. विशेष म्हणजे महिला पालकांचा उत्स्फूर्त सहभाग वाखाणण्याजोगा होता.

 

मुख्याध्यापक किरणकुमार पाटील यांनी सर्व मान्यवरांचे, पालकांचे, शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे आभार मानत, “शिक्षण हे पाठांतर नव्हे; जीवन जगण्याची कला शिकवणे हेच आमचे ध्येय आहे,” असे सांगत उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.

 

उपक्रमातील एकूण खरेदी–विक्री व्यवहार अंदाजे ₹३५,८७५ इतका झाला.

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक सुरेखा चौधरी, पंकज रगडे, रामचंद्र महाकाळ, मंगला बोरसे, सविता पाटील, प्रतिभा कोळी, शेख विखार, बिलाल बागवान, अनिल देसाई, तानाजी चव्हाण, शुभम देसले, पुनम लाड यांनी मोलाचे योगदान दिले.

 

फोटो दत्तात्रय काटोले