चोपडा महाविद्यालयात युवतींसाठी आयोजित सहा दिवसीय अग्निवीर सैन्य दल पोलिस भरती पूर्व प्रशिक्षणाचा समारोप

चोपडा महाविद्यालयात युवतींसाठी आयोजित सहा दिवसीय अग्निवीर सैन्य दल पोलिस भरती पूर्व प्रशिक्षणाचा समारोप

चोपडा: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग व कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२० फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२३ दरम्यान युवतीसभेअंतर्गत अग्निवीर सैन्य दल पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण’ राबवण्यात आले. या अभियानात महाविद्यालयातील विद्यार्थिनींना ०६ दिवस रोज ०२ तास अग्निवीर सैन्य दल पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण निवृत्त आर्मी ऑफिसर गोपाल रमेश सोनवणे थेअरी प्रशिक्षण, लक्ष्मण पांडुरंग महाजन पीटी प्रशिक्ष तसेच सतीश ठाकरे यांनी ड्रिल प्रशिक्ष दिले. या प्रशिक्षणाचा समारोप सोहळा आज दि.२५ फेब्रुवारी २०२३ रोजी पार पडला.
या कार्यक्रमाप्रसंगी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील यांनी या प्रशिक्षणास भेट देवून विद्यार्थिनीशी सुसंवाद साधला व कार्यक्रमाचा आढावा घेतला. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य यांनीही वेळोवेळी प्रशिक्षणस भेट देवून विद्यार्थिनींचा उत्साह वाढवला.
या कार्यकमाच्या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे हे उपस्थित होते. याप्रसंगी उपप्राचार्य एन.एस. कोल्हे, रजिस्ट्रार डी.एम. पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.एस.ए.वाघ, युवतीसभा प्रमुख डॉ.सौ.पी.एम रावतोळे, सौ. मायाताई शिंदे, सौ क्रांती क्षीरसागर, सौ. सुनीता पाटील, डॉ. सौ. संगीता पाटील आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना युवती सभा प्रमुख डॉ.सौ प्रिती रावतोळे म्हणाल्या की, आत्मनिर्भर व सशक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युवतींची महत्वपूर्ण भूमिका असावी तसेच त्यांच्यात राष्ट्रीय अभिमान व राष्ट्रसेवा आणि शिस्त व कौशल्य ही मूल्ये रुजावी या दृष्टिकोनातून ही योजना विद्यापीठ व महाविद्यालय यांच्यातर्फे हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन.एस. कोल्हे यांनी विद्यार्थिनीशी संवाद साधला व त्या त्यांनी काही उदाहरणे देवून स्पष्ट केले की, स्री बिकट प्रसंगात ही स्वतः ला, कुटुंबाला सावरून ठामपणे उभी राहू शकते. ही स्वतः मधील शक्ति आपण ओळखायला हवी.
त्यानंतर विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.एस.ए.वाघ यांनी विद्यार्थ्याना या प्रशिक्षणा नंतर त्यांच्या साठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत? त्या बद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थिनी नीलांबरी या सहभागी विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, या प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास तसेच त्यांची शारीरिक क्षमता वाढविण्यास मदत झाली त्यामुळे व पुढील जीवनात पोलिस भरतीसाठी नक्कीच त्यांना ह्या प्रशिक्षणा चा फायदा होईल.
प्रा. डॉ. के. एन सोनवणे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, नेहमी शिस्तीचे पालन करावे व हा जो सराव आहे हा इथेच न थांबविता अविरत चालू ठेवावा तसेच आपली क्षमता वाढवावी व यशस्वी होण्यासाठी सातत्य ठेवणे अतिशय महत्वाचे आहे.
या समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. सुनीता पाटील यांनी केले तर आभार डॉ.सौ संगीता पाटील यांनी मानले.
यानंतर सर्व मान्यवरांच्या समोर विद्यार्थिनींनी ०६ दिवस घेतलेल्या प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षक यांच्या मदतीने करून दाखवले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी डॉ.बी.एम. सपकाळ, सौ.रजनी जैसवाल, सौ.पूजा पुनासे, आशा शिंदे, सौ. हर्षा देवरे, अश्विनी जोशी, सौ.एच.ए.सूर्यवंशी, रवी पाटील, सुधाकर बावीस्कर यांनी परिश्रम घेतले. या अभियानात महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.