पाचोरा येथे संत श्री गजानन महाराज प्रकटदिन उत्साहात साजरा

पाचोरा येथे संत श्री गजानन महाराज प्रकटदिन उत्साहात साजरा

पाचोरा ( प्रतिनिधी ) पाचोरा शहरातील देशमुख वाडी येथील रहिवासी प्रमोद हरीचंद्र सोनवणे ( सोनार ) यांच्या निवासस्थानी गेल्या 22 वर्षांपासून शेगावीचे संतश्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आरती व महाप्रसाद चे आयोजन करण्यात येते या निमित्ताने संत श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा अन्नदानाच्या पंगतीची मेजवानी देवुन साजरा करतात. आज संतश्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आयोजित अन्नदानाच्या पंगतीची मेजवानी देवुन श्रीचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
गण गण गणात बोतेचा गजर करत संत श्री गजानन
महाराजांची आरती करण्यातआली या सर्व धार्मिक उपक्रमानी बुधवारी संत श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सालाबादाप्रमाणे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरती व पूजाविधी ॲड राजेंद्र भगवान देवरे व सौ प्रियंका राजेंद्र देवरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.महाप्रसादा चे आयोजन प्रमोद सोनवणे, चंचल सोनवणे, गौरी सोनवणे, व समस्त गजानन परिवाराच्या वतीने करण्यात आले होते