पाचोरा तहसिलदार यांनी मनमानी कारभार थांबवावा* – पंचायत समिती सभापती वसंत गायकवाड

*पाचोरा तहसिलदार यांनी मनमानी कारभार थांबवावा*
– पंचायत समिती सभापती वसंत गायकवाड
*पाचोरा, प्रतिनिधी* !
पाचोरा तहसिलदार हे जनतेत नेहमी हुकुमशाही पध्दतीने वागतात. नेहमी फोन केला असता फोन उचलत नाही. तसेच आम्हा लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे जनतेच्या समस्या घेऊन गेल्यावर नेहमी अरेरावीची व उध्दट भाषाशैलाचा वापरत करत असतात. मी मागासर्वीय व भटक्या जमातीतुन निवडुन आलो असुन माझ्याकडे भिल्ल, बोध्द व इतर विमुक्त जमातीचे लोक मोठया अपेक्षेने व आशेने त्यांची कामे घेऊन येतात. भिल्ल
समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळणाबाबत येतात अशा वेळेस तहसीलदार व त्याच्या
कार्यालयातील कर्मचारी गरीब लोकांकडुन त्यांच्या एजंटमार्फत पैशांची मागणी करत असतात.
लोक जेमतेम मोल मजुरी करुन आपला उदर निर्वाह करत असतात अश्यात त्यांना तालुक्याच्या ठिकाणी ३ ते ४ वेळेस बोलाऊन त्यांची लुबाडणुक एजंट मार्फत होत असुन या एजंटाना सर्व
कर्मचारी व अधिकारी सामील असुन ते त्या एजंटाची नावे सागंत असतात. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील मग तो साधा जातीचा दाखला असो किंवा शिधापत्रीका किंवा शैक्षणिक विद्यार्थ्यांचे दाखले, शेती उतारे नोंदी, उत्पादन दाखले तहसील कार्यालयातुन मिळणा-या सर्व सेवाना एजंटामार्फत पुरविल्या जात असुन सामान्य जनतेची पिळवणूक व फसवणुक केली जात आहे. ही जनता माझ्याकडे संबंधित विभागाची तक्रार घेऊन येतात. तरी मी संबंधित अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधी या नात्याने समजविण्याचा प्रयत्न करीत असतो. तरीपण ते अधिकारी सांगतात. तहसीलदार यांनी सांगितले आहे. असे सांगतात बोलण्यास व भेटण्यास वेळ नाही तरीपण ते फोनसुध्दा उचलत नाही. अशा आषयाचे निवेदन पंचायत समितीचे सभापती वसंत गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांना गेल्या १५ दिवसांपूर्वीच दिले असुन याबाबत जिल्हाधिकारी यांनी गोर – गरिब नागरिकांना होत असलेल्या त्रासाची योग्य ती दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.