पाचोरा व भडगावांतील शेतकऱ्यांच्या (पीएम किसान) सन्माननिधी साठी भाजपा आक्रमक

पाचोरा व भडगावांतील शेतकऱ्यांच्या (पीएम किसान) सन्माननिधी साठी भाजपा आक्रमक
———————————————————
तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांचे प्रशासनाला निवेदन

पाचोरा-
येथील भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी ने प्रधानमंत्री किसान सन्माननिधी पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध अडचणी तसेच पात्र शेतकर्‍यांना e-KYC करण्याबाबत येणाऱ्या समस्यांबाबत आज दि.०८ फेब्रुवारी रोजी मा.प्रांताधिकारी मा.तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सविस्तर मांडल्या व त्या आशयाचे निवेदन दिले
यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाशी बोलतांना सांगितले की शेतकऱ्यांच्या दृष्टीने व देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मा. श्री.नरेंद्रजी मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम – किसान) संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांना फायद्याची ठरत आहे.सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये दरवर्षी रु.६०००/- वितरित करण्यात येत आहेत.परंतु ९ ऑगस्ट २०२१ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेल्या ९ व्या हप्त्याची रक्कम व १ जानेवारी २०२२ रोजी जमा करण्यात आलेली १० व्या हप्त्याची रक्कम बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नसल्याबाबतचे तक्रारी भाजपा कार्यलयात प्राप्त होत आहेत.
याबाबत शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे लक्षात आले आहे की काही शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक चुकले असल्याने,आधार बँकेस लिंक नसल्याने,तसेच काही शेतकऱ्यांचे जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खाते क्रमांक बदलल्याने सदरचा निधी जमा होण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
तसेच प्राप्त माहितीनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांची e-KYC करण्याबाबत देखील शासनाने सूचना निर्गमित केलेल्या आहेत. सदरील e-KYC चे काम दिनांक : ३१ मार्च २०२२ अखेर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना असल्याचे कळते.परंतु प्रधानमंत्री किसान सन्मान निधी चे काम कोणी करावे (महसूल विभाग/कृषि विभाग) हा प्रश्न आज तागायत अनुत्तरित आहे.वरील नमूद केल्या प्रमाणे अडचणी सोडवण्यासाठी शेतकरी संबंधित तालुक्याचे तहसिल कार्यालय व तालुका कृषी अधिकारी कार्यालय च्या फेर्‍या मारून त्रस्त झालेले आहेत.
यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी मा.प्रांताधिकारी विक्रम बांदल, मा.तहसीलदार कैलास चावडे,व मंडळ कृषी अधिकारी मोहिते यांना विनंती केली की तात्काळ संबंधित विषयांमध्ये व्यक्तीशा लक्ष घालून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी चे काम तात्काळ पूर्ण करण्याच्या संबंधित यंत्रणांना सूचना द्याव्यात जेणेकरून एप्रिल ते जुलै २०२२ दरम्यान शेतकऱ्यांना सदरच्या निधीचा प्राप्त होणारा ११ वा हप्ता जमा होण्यास कुठलीही अडचण येणार नाही.तसेच पात्र नोंदणीकृत शेतकऱ्यांची e-KYC चे काम देखील मुदतीत होणे गरजेचे आहे.अशी निवेदनाद्वारे मागणी करत पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकरी सदर लाभापासून वंचित राहू शकतात. यासाठी आपण सदरच्या योजनेपासून शेतकरी वंचित राहणार नाहीत. याबाबतची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित विभागांना द्याव्यात.
अन्यथा शेतकऱ्यांसाठी भारतीय जनता पार्टी पाचोरा व भडगाव तीव्र स्वरूपाचे आंदोलन करत रस्त्यावर उतरले.असा इशारा यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिला.याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सतीशबापू शिंदे,शहराध्यक्ष रमेश वाणी,पंचायत समिती सदस्य बन्सीलाल पाटील,सरचिटणीस गोविंद शेलार,संजय पाटील ,दीपक माने,नगरदेवळा सरपंच किरण काटकर,नंदू बापू सोमवंशी,प्रदीप नाना पाटील, जगदीश पाटील,समाधान मुळे,राहुल गायकवाड,नितेश पाटील,प्रशांत सोनवणे,योगेश ठाकूर,पप्पू पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.