देवणी तालुक्यातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री मा, अशोकराव चव्हाण यांना दिले निवेदन

देवणी तालुक्यातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री मा, अशोकराव चव्हाण यांना दिले निवेदन

देवणी प्रतिनिधी

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दिनांक ९/२/२०२२रोजी आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदन माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र यांना तहसिलदारामार्फत देण्यात आलेले आहे तुरोरी ते तोगरी का्स येथील होत असलेले रोडचे काम हे निकृष्ट दर्जाचे व संथ गतीने होत असून याची चौकशी करावी अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल तुरोरी ते तोगरी का्स पर्यंत होत असलेल्या मेन रोडचे कामाबाबत वारंवार निवेदने देऊन ही व दोन वेळा रास्ता रोको व एक वेळा अमर उपोषण करून ही अद्यापि याची चौकशी गुत्तेदार आणि अद्यापि याची चौकशी होत नाही यामुळे गुत्तेदार हे निवेदन कर्त्यास म्हणतात की जर या पुढे निवेदन दिल्यास मारण्याची व गुन्हे दाखल करण्याची धमकी देतात सदर रोडचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे व माती मिश्रित होत असून याबाबत अनेक वेळा तक्रार व पुरावे देऊन देखील सदर काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून हे काम अधिकारी व गुत्तेदार यांच्या संगनमताने होत असून एजन्सी धारक व त्यांचे इंजिनियर यांच्या वर तात्काळ कार्यवाही करून गुन्हे दाखल करण्यात यावे
याबाबत निवेदने व पुरावे देऊन देखील अद्यापर्यंत प्रशासकीय अधिकारी यांची गुत्तेदार आच्या कामावर लक्ष दिसून येत नाही व कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही तसेच सदर काम हे पावसाळ्यात तोगरी का्स वलांडी दरम्यान अनेक लोकांचे एक्सीडेंट झालेले असून त्यात कोणाचे हात तर कोणाचे पाय वा कोणाची डोक्याला मार लागलेला आहे अक्सिडेंट झालेल्या व्यक्तीचे देवणी ग्रामीण रुग्णालयात नोंद आहे सध्या परिस्थितीत ज्या गावातून हा रस्ता गेलेला आहे त्या सर्व गावात धुळीचे साम्राज्य असून सदर रस्त्या शेजारील शेती पिकाचेही धुळीमुळे नुकसान होत आहे यामुळे शेतकरी व नागरिक त्रस्त आहेत एक वाहन गेल्यावर धुळीमुळे समोर काहीच दिसत नसून यामुळे अपघात होत आहेत नागरिकाचे किती बळी गेल्यावर याकडे शासन दखल घेईल असा संतप्त प्रतिक्रिया जनतेतून होत आहे तसेच सदर कामात जोपर्यंत सुधारणा होत नाही तोपर्यंत देयक अदा करण्यात येऊ नये तसेच दिनांक ११/१/२०२१ रोजी सदर रोड ची माहिती चा अधिकारांतर्गत माहिती मागितला असता सदर कामाचे माहिती न देता उलट आमच्याकडे डि आर डि प्रमाणपत्र असून देखील माहिती शुल्क भरा मग माहिती घ्या असे म्हणत आहेत तसेच सदरील सर्व प्रकरणात सर्व सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी कॉन्ट्रॅक्टर यास पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे तरी कॉन्ट्रॅक्टर चे व इंजिनियर चे यांची चौकशी करून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अन्यथा दिनांक ९/२/२०२२रोजी आमरण उपोषण करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी असे इशारा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने माननीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेब मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र यांना निवेदनाद्वारे तहसीलदार साहेब यांच्यामार्फत देण्यात आले