जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची गोद्री येथील महाकुंभ स्थळास भेट

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची गोद्री येथील महाकुंभ स्थळास भेट

जळगाव, : गोद्री, ता. जामनेर येथील गौर बंजारा, लबाना-नायकडा समाजाच्या महाकुंभ स्थळास जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी (27 जानेवारी) भेट देऊन तेथील सोईसुविधांची पाहणी केली.

जिल्हाधिकारी श्री. मित्तल यांनी गोद्री येथील गौरबंजारा समाज कुंभ येथील 2 कि.मी. चा यात्रा परिसर पायी चालून याठिकाणी आलेल्या भाविकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सोईसुविधांची माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर याठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे स्थापन करण्यात आलेल्या आपत्कालीन नियंत्रण कक्ष तसेच मुख्य सभा मंडप, पिण्याचे पाणी व्यवस्था, भाविक तसेच व्हीआयपी निवास व भोजन व्यवस्था, विविध बचत गटांचे स्टॉल, यात्रा मार्ग, स्वच्छता व्यवस्था, हेलिपॅड व्यवस्था यांची पाहणी करून आवश्यक तेथे महत्त्वपूर्ण सुचना देऊन मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांचेसमवेत जळगावचे प्रांताधिकारी महेश सुधाळकर, जामनेरचे तहसीलदार अरुण शेवाळे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार प्रशांत वाघमारे यांचेसह पोलीस अधिकारी उपस्थित होते.