Home जळगाव चोपडा येथील दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयात ‘द बॉटनी बेंच प्लांट नर्सरी’चे उदघाटन...

चोपडा येथील दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयात ‘द बॉटनी बेंच प्लांट नर्सरी’चे उदघाटन उत्साहात संपन्न

चोपडा येथील दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयात ‘द बॉटनी बेंच प्लांट नर्सरी’चे उदघाटन उत्साहात संपन्न

 

चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने ‘द बॉटनी बेंच प्लांट नर्सरी’ या अभिनव उपक्रमाचा उदघाटन समारंभ दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे उदघाटन महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. सौ.स्मिताताई संदीप पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अँड . संदीप सुरेश पाटील यांनी या उपक्रमाला प्रोत्साहित करून उदघाटन कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या एम. सोनवणे तसेच उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा.डॉ. ए. बी. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ. बी. एम. सपकाळ, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. एन. सौदागर, डॉ. जे. जी. पाटील, प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. एच. जी. सदाफुले, सूक्ष्मजीवशास्र विभाग प्रमुख, प्रा. व्ही. के. पटेल तसेच ललित पाटील, यादवी पाटील, राजश्री निकम, सविता पारडे, अश्विनी पवार आदि मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. एन. सौदागर यांनी केले.

या उदघाटनप्रसंगी डॉ. सौ.स्मिताताई संदीप पाटील यांच्या हस्ते ‘मेडशिंगी’ या दुर्मिळ वनस्पतीचे कुंडीत रोपण करून वनस्पती संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी दुर्मिळ व स्थानिक वनस्पतींचे संवर्धन करण्याबरोबरच विविध शोभिवंत वनस्पतींची लागवड व संगोपन मोठ्या प्रमाणात करावे, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी महाविद्यालयीन परिसर अधिक हिरवागार व जैवविविधतेने समृद्ध करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

‘द बॉटनी बेंच प्लांट नर्सरी’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वनस्पतींची लागवड, रोपांची निर्मिती, संगोपन, संवर्धन तसेच वनस्पतींच्या विविध प्रजातींची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वनस्पती संवर्धनाची आवड निर्माण होऊन पर्यावरणपूरक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होणार आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जे. जी. पाटील यांनी केले तर आभार वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. एन. सौदागर यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनस्पतीशास्त्र विषयाचे द्वितीय व तृतीय वर्षाचे विद्यार्थी तसेच संकेत कोरडे, रमनलाल पाटील, रवी मांडोळे, जीवन बागुल आणि यतीन पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.

Don`t copy text!