Home महाराष्ट्र पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस काॅंन्स्टेबल निलेश दहिफळे यांची पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड...

पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस काॅंन्स्टेबल निलेश दहिफळे यांची पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा पाथर्डी पोलिसांकडून सन्मान

पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस काॅंन्स्टेबल निलेश दहिफळे यांची पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा पाथर्डी पोलिसांकडून सन्मान

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये पोलिस कॉन्स्टेबल म्हणून सेवेत असलेले बक्कल क्रमांक (१०५४) निलेश अंबादास दहिफळे यांची पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पोलिस कॉन्स्टेबल निलेश दहिफळे हे सध्या पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये काॅंन्स्टेबल म्हणून सेवेत आहेत.त्यांची सन २२ मे २०१८ रोजी अहिल्या नगर जिल्ह्यातील पोलिस भरतीत निवड करण्यात झाली होती.त्या नंतर त्यांनी पोलिस दलातील असलेले कठोर परिश्रम पुर्ण करुन ६ जून २०१९ रोजी ट्रेनिंग पूर्ण केले होते.त्यांची प्रथम पोलिस मुख्यालय अहिल्या नगर येथे सेवा सुरू झाली होती.सेवा सुरू असताना त्यांनी पुढील श्रेणी मिळावी म्हणून गेली सहा वर्षे पुढील अभ्यासक्रम सुरू ठेवला होता.नंतर त्यांची २ मार्च २०२४ रोजी पाथर्डी येथे बदली झाली होती.पुढे त्यांनी उपनिरीक्षक पदाची परीक्षा देऊन चांगले गुण मिळवून बहुमान पटकावला होता.आता त्यांची पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे.पोलीस काॅंन्स्टेबल निलेश दहिफळे यांनी पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये दैनंदिन कर्तव्य बजावत असताना पुढील परीक्षेत यश संपादन केले आहे.त्यांची उपनिरीक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. व पाथर्डी पोलिस स्टेशनच्या सर्व पोलिसांनी त्यांचें अभिनंदन केले आहे. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Don`t copy text!