बारामतीत २३ तर राहुरीत ७ उमेदवार निवडणूक रिंगणात,बिचकुले, मुंडे ,मोकाटेंनी मोका साधला, मुख्यमंत्र्यांनी सर्व भाजप जुंपली प्रचाराला

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
महाराष्ट्र विधानसभेच्या बारामती आणि राहुरी या दोन मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण ५५ उमेदवारांनी ६८अर्ज दाखल केले होते त्यापैकी फक्त २३ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत.तर राहुरी विधानसभा मतदार संघात ३० पैकी फक्त ७ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.भाजपचा बिनविरोध निवडनूकीचा बार फुसका निघाला आहे.बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात २२ लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.त्या मध्ये प्रामुख्याने धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा मुंडे, अभिजित बिचकुले,आणि इतर २० जणांनी असे एकूण २३ उमेदवार आपले अर्ज दाखल करून नशिब अजमावत आहेत.तर राहुरी विधानसभा मतदार संघात माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले साहेब यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांच्या विरोधात २९ जणांनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी फक्त सहा जणांनी आपले उमेदवारी अर्ज ठेवून अक्षय कर्डिले यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे गोविंदराव मोकाटे,वंचितचे संतोष चोळके, अपक्ष रावसाहेब खेवरे,महेश हापसे,सुरेश लांबे,अथर्व म्हसे या उमेदवारांचा समावेश आहे.भाजपचा बिनविरोध निवडनुकीचा बार फुसका निघाल्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारी भाजप चाटुन पुसुन या दोन मतदारसंघात प्रचारासाठी जुंपली आहे. मुख्यमंत्र्या सह एकूण ४० नेते या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी केले आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सह केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण,चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, अशोक चव्हाण, शिवप्रकाश, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, सुधिर मुनगंटीवार, आशिष शेलार,नामदार राम शिंदे साहेब, नामदार राधाकृष्ण विखे पाटील, नामदार पंकजा मुंडे, गिरीश महाजन, मुरलीधर मोहोळ, उदयनराजे भोसले, जयकुमार रावल, गणेश नाईक, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, नितेश राणे, मेघना बोर्डीकर, अतुल सावे,चित्रा वाघ,अशोक उईके,डॉ भागवत कराड,प्रविण दरेकर,गोपिचंद पडळकर,धनंजय महाडिक,संजय कुटे,भारती पवार,मायाताई ईवनाते,रामदास वडकुते,डॉक्टर सुजय विखे,अमित गोरखे,योगेश टिळेकर,राहुल कुल,इंद्रिस मुलतानी, आमदार मोनिका राजळे या ४० जणांचा समावेश आहे.बिनविरोध निवडीचा फुसका बार भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सर्व भाजप एकवटून विजयासाठी कंबर कसली आहे.शरदचंद्र पवार यांनी बारामती मध्ये आपल्या पक्षाचा उमेदवार न देता आपल्याच सुनबाईच्या घराणेशाहीच्या पोळीवर तूप ओढून घेतले आहे.परंतु राहुरीत मात्र भाजपला खैबर खिंडीत गाठले आहे. बारामती पेक्षा राहुरीची निवडणूक भाजपने अतिशय प्रतिष्ठेची केली आहे.अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नेते चाटुन पुसुन राहुरीतील पांडुरंग मंगल कार्यालयात हजर होते.आणि त्याच दिवशी तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही म्हणून भाजपने हुरळून जाऊन आपला विजय घोषित केला.पण दुसऱ्या क्षणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांच्या गटाचे नेते गोविंदराव मोकाटे,शिंदे शिवसेनेचे रावसाहेब खेवरे, यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून भाजपच्या विजयाची सारी हवाच काढून टाकली आहे.तनपुरे यांना उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपने आडकाठी आणली म्हणून तनपुरेचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत. प्राजक्त तनपुरे यांनी जरी सांगितले तरी आम्ही भाजपला मतदान करणार नाही असा पवित्रा त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. भाजपला राहुरीची निवडणूक ही अतिशय सोपी वाटली होती परंतु भाजपने तनपुरे यांच्या वर केलेल्या खेळीमुळे आता या निवडणुकीत अतिशय चुरस निर्माण करून भाजपला पळता भुई थोडी केली आहे. शरदचंद्र पवार ऐनवेळी काय खेळी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे अतिशय सावधानतेचा इशारा म्हणून केंद्रीय भाजपने आपला देवबाबा आणि थयथय नाचणाऱ्या चाळीस मोरांचा फौजफाटा प्रचाराला जुंपला आहे.या पोट निवडणुकी कडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की आम्ही ही निवडणुक निश्चितच जींकू तर भाजपला राहुरीची निवडणूक ही अतिशय अटीतटीने काही झाले तरी जींकायचीच आहे. वंचित चे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ही आपला उमेदवार उभा करून भाजपला जोरदार शह दिला आहे.राहुरीची निवडणूक अतिशय वेगळ्या पद्धतीने लढवली जात आहे.
























