Home पाचोरा श्री. गो.से.हायस्कूलमध्ये श्री.आर.बी.तडवी सरांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न

श्री. गो.से.हायस्कूलमध्ये श्री.आर.बी.तडवी सरांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न

श्री. गो.से.हायस्कूलमध्ये श्री.आर.बी.तडवी सरांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न

 

 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हायस्कूल येथे पर्यवेक्षक श्री.आर.बी.तडवी सर 30 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाले.

. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.एन.आर. ठाकरे सर यांनी केले.

संस्थेचे चेअरमन मा.नानासाहेब श्री.संजय ओंकार वाघ यांच्या हस्ते श्री.आर.बी.तडवी सरांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन मा.नानासाहेब श्री.व्ही.टी.जोशी, ज्येष्ठ संचालक मा. दादासाहेब श्री.अर्जुनदास पंजाबी, मा.आबासाहेब श्री.भागवत महालपुरे , मा.बापूसाहेब श्री. प्रकाश पाटील ,संस्थेचे मान्यवर, माजी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक शिक्षक,आप्तेष्ट व नातलग यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उपमुख्याध्यापक श्री.आर.एल पाटील, पर्यवेक्षिका सौ.ए.आर. गोहिल ,पर्यवेक्षक श्री.आर.बी.बांठिया, क्रीडा प्रमुख श्री.एस.पी. करंदे, कार्यालयीन प्रमुख श्री.ए.बी.सिनकर, किमान कौशल्य प्रमुख श्री.मनीष बाविस्कर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

व्हाईस चेअरमन मा. नानासाहेब श्री.व्ही.टी.जोशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री.तडवी सरांना भावी निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

उपमुख्याध्यापक श्री.आर .एल .पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. एम.टी.कौंडिण्य, सु.गी.पाटील माध्यमिक विद्यालय भडगाव चे मुख्याध्यापक श्री.ए.बी.अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. आर बी.बोरसे यांनी तर आभार प्रदर्शन श्री.आर.एन.सपकाळे यांनी केले.

Don`t copy text!