पाचोरा कराओके परिवारातर्फे स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या १००व्या वाढदिवसानिमित्त सदाबहार गीतांनी विनम्र अभिवादन
स्वर्गीय मोहम्मद रफी साहब यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त *पाचोरा कराओके ग्रुप* तर्फे स्व मोहम्मद रफी साहेब यांनी गायलेल्या सदाबहार गीतांना गाऊन त्यांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमात श्री रहीम तडवी सर,श्री सागर थोरात सर ,श्री रवींद्र जाधव सर श्री राजू पाटील, नासीर शेख श्री भरत कुमार प्रजापत, माधुरी थोरात सार्थक थोरात,प्रज्वल प्रजापत, अथर्व प्रजापत इत्यादींनी रफी साहेबांची अजरामर गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री रहीम तडवी सर यांनी स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले व तसेच श्री विशाल थोरात ,पंकज धनराले, जुबेर भाई खाटीक (हॉटेल दिल्ली दरबार) इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले व त्या नंतर श्री सागर थोरात सर, यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता झाली