पाचोऱ्यात भरधाव ट्रकने उडवेल इलेक्ट्रिक पोल :ट्रक पलटी एक जखमी
पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील बायपास रोडवर ट्रक पाचोर्याकडुन पहुर कडे जात असताना अचानक भरधाव वेगाने ट्रक पलटी झाला असून जीवितहानी टळली आहे. ट्रक चालक जखमी
पाचोरा शहरातील बायपास वरुन आज दि. १९ रोजी दुपारी ११.३० ते १२ दरम्यान भडगाव कडुन पहुर कडे जाणारा ट्रक क्रमांक एमएच १९ सी एक्स ४६९९ अचानक विकास कॉलनी कडुन एक मोटरसायकलस्वार वाचायला गेला आणि ट्रक चा वेग जोरात असलेल्या डीव्हायडर असलेल्या पोल ला धडक देऊन ट्रक सामान सहीत विरुद्ध दिशेने जाउन पलटी झाला. ट्रक चालक राजु पाटील गाडीत होता त्याला तात्काळ पो. कॉ. दिपक पाटील यांनी वाचविले. चालक किरकोळ जखमी झाला आहे. यावेळी समोरुन येणारे दोघे मोटरसायकल वरील चौघे वाचले. घटनास्थळी तात्काळ कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, पी एस पाटील यांनी भेट देऊन दुर्घटना ग्रस्त ट्रक ची पहाणी केली. ट्रक मध्ये अॉईल ने भरलेला होता. या अपघातात रस्त्यावरील इलेक्ट्रिक पोल चक्काचूर झाला. शहरातील बायपास वर जड वाहनांना हळु चालले पाहिजे असा सुर बघ्यांचा होता.

























