पाचोरा महसूल विभागाचा धडाका; अवैध वाळू वाहतूक करणारे ४ ट्रॅक्टर जप्त
नांद्रा (ता.पाचोरा)ता.१८
पाचोरा महसूल विभागाने अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. आज दि. १८ मार्च रोजी मौजे बांबरूड (महादेव) परिसरातून अवैध वाळूची अनधिकृतरीत्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू वाहतूक करणाऱ्या ९ ते १० ट्रॅक्टर गावकऱ्यांसह तलाठी, पोलीस पाटील, महसूल सेवक यांच्या पथकाने अडवले या सर्व वाहनांना वर कारवाई करण्यासाठी १६ तलाठी व पोलीस प्रशासन नदीपात्रात गेले असता सहा ते सात ट्रॅक्टर शेतातील पिकं व ठिबकसह शेतात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत शेतातुन ट्रॅक्टर पळवून नेले असता त्यातील अवैध वाळू वाहतूक करणारे ४ ट्रॅक्टर पथकाने रंगेहात पकडले आहेत.
बांबरूड परिसरात विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. पकडलेले चारही ट्रॅक्टर जप्त करून पाचोरा तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आले आहेत.
महसूल पथकाची कामगिरी:
अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी तहसीलदार विजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे विशेष पथक तैनात करण्यात आले होते. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि दंडात्मक कारवाई तहसील कार्यालयामार्फत केली जात आहे.
या पथकात पोलीस पथकात सचिन पाटील सह तलाठी दिपक दवंगे, नकुल काळकर, अतुल पाटील, अमोल शिंदे, निखिल भोई, योगेश व्यास, अजमल शाह मकांदा, तात्याराव सपकाळ, सागर मोरे, उमेश पाटील यांच्या सह पोलीस पाटील, ग्राम महसूल सहाय्यक यांच्या पथकाने कारवाई केली.
























