Home जळगाव प्रकाश तेलींच्या शाश्वत विचार या 20 व्या ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांचे...

प्रकाश तेलींच्या शाश्वत विचार या 20 व्या ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांचे हस्ते प्रकाशन

प्रकाश तेलींच्या शाश्वत विचार या 20 व्या ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांचे हस्ते प्रकाशन

 

 

 

जळगांव | विशेष प्रतिनिधी

 

दर्जेदार व अनोखे साहित्य लेखानात निष्णात असलेले कवी, लेखक, पत्रकार आणि गीतकार प्रकाश तेली यांच्या शाश्वत विचार या 20 व्या ग्रंथाचे प्रकाशन पद्मश्री चैत्राम पवार व मान्यवरांच्या हस्ते घरगुती वातावरणात व साध्या पध्दतीने जळगांव येथे संपन्न झाले. शाश्वत विचार या ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी मा. अनिल पाटील, प्रकाश तेली, योगीता तेली, ॲडव्होकेट किरण तेली, आर्यन तेली, आर्या तेली व अन्य उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनप्रसंगी वार्तालाप करतांना पद्मश्री चैत्राम पवार यांनी प्रकाश तेली यांच्या साहित्य कार्याचे तोंडभरून कौतुक केले व साहित्य कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पद्मश्री चैत्राम पवार यांनी प्रकाश तेली यांना आपल्या मूळगावी संपूर्ण कुटुंबासह मुक्कामी येण्याचे निमंत्रण दिले. प्रकाश तेली यांचे साहित्य कार्य आगळेवेगळे असून ते जीवनाला दिशा देणारे आहे असे गौरवोद्गार पद्मश्री चैत्राम पवार यांनी ह्याप्रसंगी काढले.

 

 

 

कोण आहेत पद्मश्री चैत्राम पवार :- पद्मश्री चैत्राम पवार हे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील बारीपाडा गावातील एक प्रतिष्ठित आदिवासी सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी आहेत, ज्यांनी वनसंवर्धन, जलसंवर्धन आणि वन्यजीव रक्षणासाठी भरीव योगदान दिले आहे. ओसाड जमिनीचे हिरवळीत रूपांतर करणाऱ्या त्यांच्या कामासाठी त्यांना २०२५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 

 

 

काय आहे शाश्वत विचार ग्रंथाची विशेषता :-

 

· शाश्वत विचार या ग्रंथामध्ये अनेक अभिनव व वास्तव विचार आहेत, हे विचार जीवनाचे सार सांगण्यासोबत जीवनात नवचैतन्य निर्माण करतात.

 

· जीवनात यशाची शिखरे गाठायची असतील आणि नकारात्मकतेवर मात करायची असेल, तर शाश्वत विचार हा ग्रंथ प्रत्येकाजवळ संग्रही असायलाच पाहिजे.

 

· शाश्वत विचार हा ग्रंथ केवळ शब्दांचा संग्रह नसून ते एक वास्तववादी लिखाण आहे. आजच्या काळात समाजाला अशा सकारात्मक साहित्याची गरज आहे.

 

 

 

प्रकाश तेली यांची प्रतिक्रिया : – सजीवसृष्टीवरील काही गोष्टी, घटना, विचार हे शाश्वत आणि अपरिवर्तनीय आहेत. याच गोष्टी शाश्वत विचार या ग्रंथाचा प्रेरणाश्रोत आहेत. शाश्वत विचार हा ग्रंथ प्रेरणा देण्याचे, धारणा बदलण्याचे व मनोकामना कशी पूर्ण होते याबद्दल माहिती देतो. शाश्वत विचार हा ग्रंथ अनेक उद्देश डोळ्यासमोर ठेवून लिहिलेला असला तरी, प्रत्येक सजीवांचे जीवन सुसह्या व्हावे हा मुख्य उद्देश या ग्रंथ लिहिण्यामागे आहे.

 

 

 

प्रकाश तेली यांचा गौरवशाली साहित्य प्रवास (19 ग्रंथ प्रकाशित) : – प्रकाश तेली यांनी यांचे आता पर्यंत 19 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत ते पुढील प्रमाणे 1) सड़क सुरक्षा 2) बाल-विवाह 3) बढ़ती जनसंख्या 4) किसान 5) वोट 6) नदी-भारत की जलधारा 7) वोट-2 8) वोट-3 9) खाद्य सुरक्षा 10) वोट-4 11) पानी 12) मन की बात 13) बिजली संरक्षण 14) शिक्षा की महत्ता 15) पेड़ की महत्ता 16) प्रकृति की महत्ता 17) झाडे जीवनाचा आधार – मराठी 18) जीवन म्हणजे काय? – मराठी 19) प्रेरणादायी विचार – मराठी

 

प्रकाश तेली यांचा लवकरच 21 वा वास्तव विचार हां ग्रंथ लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे. शाश्वत विचार या ग्रंथनिर्मितीसाठी इंद्रवदन वरणकर, किरण तेली आणि आर्यन तेली यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

Don`t copy text!