Home पाचोरा आज पाचोऱ्यात महाशिवरात्री निमित्त कृष्णापुरी भागात कीर्तन ह.भ. प. गोपीनाथ महाराज जरांगे...

आज पाचोऱ्यात महाशिवरात्री निमित्त कृष्णापुरी भागात कीर्तन ह.भ. प. गोपीनाथ महाराज जरांगे पाटील याचं जाहीर कीर्तन 

आज पाचोऱ्यात महाशिवरात्री निमित्त कृष्णापुरी भागात कीर्तन ह.भ. प. गोपीनाथ महाराज जरांगे पाटील याचं जाहीर कीर्तन

 

 

पाचोरा (प्रतिनिधी) – कृष्णापुरी परिसरातील जुने महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांसाठी कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९ ते ११ या वेळेत श्री ह. भ. प. गोपीनाथ महाराज जारंगे पाटील, बीड यांचे कीर्तन होणार आहे. तसेच दि. १६ फेब्रुवारी २०२६ (सोमवार) रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

हा कार्यक्रम जुने महादेव मंदिर, महादेव गल्ली, मराठी शाळेजवळ, कृष्णापुरी, पाचोरा येथे होणार आहे.

या धार्मिक सोहळ्याचे आयोजन महादेव मंदिर मित्र मंडळ, कृष्णापुरी यांच्या वतीने करण्यात आले असून परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Don`t copy text!