के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयामधे पालक सभा उत्साहात संपन्न

के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयामधे पालक सभा उत्साहात संपन्न

 

 

के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयामधे पालक सभा उत्साहात संपन्न :के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात द्वितीय आणी तृतीय , चतुर्थ वर्ष अभियांत्रिकी. इलेक्ट्रिकल व मेकनिकल च्या विद्यार्थ्यांकरिता शिक्षक पालक सभेचे आयोजन केले गेले. त्यात विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्तपने प्रतिसाद दिला . झालेल्या अभ्यासक्रमावर घटक चाचणी घेण्यात आली . त्यात विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्रत्येक विषयाचे पेपर दाखवून मिळालेल्या गुणाचे व विद्यार्थ्यांना होण्याऱ्या शैक्षणिक समस्यांचे निरसन करून मार्गदर्शन करण्यात आले . प्रत्येक विषय शिक्षकाने विद्यार्थी व पालक यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला . ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातर्फे विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधी, महाविद्यालयातून विद्यार्थ्यांची निवड या बद्दल माहिती देण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी , अकॅडमिक डीन डॉ सी एस पाटील ,ऍडमिनिस्ट्रॅटिव्ह डीन् प्रा.गणेश पाटील ,इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख प्रा.प्रसाद कुलकर्णी, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा.समाधान खैरे, यांनी पालकांशी सवांद केला आणि मार्गदर्शन केले . शिक्षक पालक सभेला पालकांनी सहभाग नोंदविला . शिक्षक पालक सभेला वर्ग शिक्षक , प्राध्यापक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.पालक सभेचे आयोजन प्रा.आर. एस.गुल्हाने यांनी केले.