शिक्षण उत्सव अंतर्गत चर्चासत्रात विजय पवार यांचा सहभाग
जळगाव – जिल्हा परिषद जळगाव व ओपन लिंक्स फाउंडेशन तर्फे शिक्षण उत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील निवडक शंभर अधिकारी /शिक्षक यांना आमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी आयोजित शैक्षणिक चर्चासत्रात पाचोरा गटशिक्षणाधिकारी विजय शांतीलाल पवार यांची निवड करण्यात आली. सोबत भुसावळ गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, डायट अधिव्याख्याता चंद्रकांत साळुंखे यांचे सह काही शिक्षक सहभागी होते. चर्चासत्रासाठी गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी गुणवत्तापूर्ण शाळा भेटी कशा कराव्या, निपुण महाराष्ट्र अभियान राबवताना येणाऱ्या अडचणी व उपाययोजना याबाबत भूमिका मांडली. तसेच शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर, विविध मार्ग, संभाव्य धोके व घ्यावयाची काळजी याबाबत गटकार्यात सहभाग देखील त्यांनी घेतला. पाचोरा तालुक्यातील केंद्र प्रमुख जितेंद्र पाटील, मुख्याध्यापक राजेंद्र गोसावी, शिक्षिका रजनी पाटील,स्मृती साबळे, शिक्षक रवींद्र कुंभार यांचा सहभाग होता.

















