पाचोरा तालुकास्तरीय परसबाग स्पर्धेत सातगाव तांडा शाळा प्रथम
पाचोरा – येथील पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे पी एम पोषण योजनेच्या माध्यमातून परसबाग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गट विकास अधिकारी सुधाकर मुंढे, गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय पोषण आहार अधीक्षक सरोज गायकवाड यांनी परसबाग स्पर्धेचे परीक्षण केले. शालेय परसबाग स्पर्धा म्हणजे शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून शाळेच्या आवारात भाजीपाला, फळे, औषधी वनस्पतींची बाग तयार करणे आणि त्यातून मिळणाऱ्या ताज्या उत्पादनांचा पोषण आहारात वापर करणे, यासाठी आयोजित केली जाणारी स्पर्धा आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना निसर्गप्रेम, जबाबदारी आणि सकस आहार मिळतो, तसेच कुपोषण दूर होते. विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त असल्याचे गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी सांगितले.सातगाव तांडा येथे परसबागेला भेट देतांना गट शिक्षणाधिकारी विजय पवार, शा पो आ अधीक्षक सरोज गायकवाड, केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर पाचोळे, मोराणकर, नामदेव पाटील.
तालुकास्तरीय परसबाग स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
प्रथम -जि. प. शाळा सातगाव तांडा
द्वितीय -जि. प. शाळा संगमेश्वर
तृतीय -डॉ जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा
प्रोत्साहनपर –
जि प शाळा निपाणे
जि प शाळा सामनेर
जि प शाळा तारखेडा बु























