Home महाराष्ट्र कासार पिंपळगावच्या नदीच्या पात्रात आढळला जीवे ठार मारून गोणीत बांधून टाकलेला अज्ञात...

कासार पिंपळगावच्या नदीच्या पात्रात आढळला जीवे ठार मारून गोणीत बांधून टाकलेला अज्ञात महिलेचा मृतदेह 

कासार पिंपळगावच्या नदीच्या पात्रात आढळला जीवे ठार मारून गोणीत बांधून टाकलेला अज्ञात महिलेचा मृतदेह

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

कासार पिंपळगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथील नदीच्या पात्रात आढळला जीवे ठार मारून गोणीत बांधून टाकलेला अज्ञात महिलेचा मृतदेह, त्यामुळे परीसरात प्रचंड प्रमाणात खळबळ उडाली आहे.या बाबतची माहिती अशी की दिनांक २७ मार्च २०२६ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कासार पिंपळगाव ग्रामपंचायत सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहीरी शेजारी मुळा पाटबंधारे विभागाच्या कॅनालच्या पाण्याने भरलेल्या नदी पात्रातील बंधाऱ्यात एका पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये दोरीने बांधलेल्या एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस काॅंन्स्टेबल बक्कल क्रमांक (१६५१) अमोल बंकट जवरे (वय वर्षे ३५),नेमणुक पाथर्डी पोलिस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा रजीस्टर नंबर २९०/२०२६ भारतीय न्याय संहितेचे २०२३ चे कलमं १०३(१),२३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा तपास पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब हे करीत आहेत.सदर गुन्ह्यात मृत्यू पावलेल्या अज्ञात अनोळखी महिलेचे वर्णन पुढील प्रमाणे आहे.रंग गोरा, उंची १६०सें.मी., अंदाजे वय ५५ ते ६० वर्षे,केस काळे पांढरे,हातात चाॅकलेटी सोनेरी रंगाच्या काचेच्या बांगड्या,गळ्यात काळ्या व पिवळ्या धातुचे मणी मंगळ सुत्र, उजव्या हातावर पाच आसरा गोंदलेल्या आहेत.अंगात काळ्या रंगाचा ब्लाऊज, व जांभळ्या रंगाची नवू वारी साडी, गळ्यात एक धातुचा ताईत,सदर मृतदेह हा काही प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.सदर गुन्ह्यातील मृत महिलेची ओळख निष्पन्न करून अज्ञात आरोपीचा शोध घेण्या करिता पाथर्डी पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास अहिल्या नगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब,शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू साहेब यांच्या सुचना आणि मार्गदर्शना खाली करण्यात येत आहे.तरी जिल्हा पोलिस दलातर्फे अहिल्या नगर जिल्ह्यातील सुज्ञ नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सदर गुन्ह्यातील अनोळखी मृत महिला आणि अज्ञात आरोपी यांच्या बाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी पाथर्डी पोलिस स्टेशन येथे ०२४२८/२२२३३३या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी अहिल्या नगर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी हरीश भोये साहेब यांच्या पोलिस पथकाने कासार पिंपळगाव, जवखेडे दुमाला हनुमान टाकळी, रस्त्यावर बसविलेले काही खाजगी सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले आहेत.या कॅमेऱ्यात काही फुटेज बंदिस्त झाले आहेत की काय त्याचा तपास करण्यात येत आहे.या घटना स्थळाकडे जाण्यासाठी जवखेडे दुमाला आणि हनुमान टाकळी या रस्त्याने जाता येते. अज्ञात आरोपी कितीही हुशार विद्वान अभ्यासू असला तरी कोणत्याही परीस्थितीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या जाणारच आहे असे पोलिस खात्याने निक्षून सांगितले आहे.नदीपात्रात हा मृतदेह आढळला असता अहिल्या नगर येथुन फाॅरेन्सीक लॅबोरेटरी आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते.श्वान पथकातील “सिमा” या श्वानाने पाटाच्या भीतीवरच घुटमळत राहिल्याने पुढील काहीच अंदाज बांधता आला नाही.सदर गुन्हा हा जमिन किंवा पैशाच्या वादावरून झाला असावा असा अंदाज पोलिसा कडून बांधला जात आहे.घटना स्थळी नदी पात्रात बघ्यांची गर्दी झाली होती. कासार पिंपळगावच्या नदी पात्रातील परीसरात या अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला असल्याने प्रचंड प्रमाणात खळबळ उडाली असून शेतात काम करणाऱ्या संपुर्ण कष्टकरी महीला वर्गात दहशत निर्माण झाली आहे.

Don`t copy text!