कोठेवाडी दरोडा व अत्याचार प्रकरणाला १७ जानेवारीला २५ वर्षे पुर्ण
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
संपूर्ण राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या आणि न्यायालयात अतिशय गाजलेल्या खटल्यापैकी कोठेवाडी दरोडा आणि अत्याचार प्रकरणाला १७ जानेवारी २०२६ रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत.त्या निमित्ताने संपूर्ण प्रकरणाचा घेतलेला मागोवा या लेखात नमूद करण्यात आला आहे.
मकर संक्रांती नंतर दोनच दिवसानी म्हणजे दिनांक १७ जानेवारी २००१ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याच्या दक्षिण बाजूस डोंगराळ भागात असलेल्या कोठेवाडी या गावात १२ ते १५ आरोपींनी काही घरावर दरोडा टाकून घरातील व्यक्तींना जबर मारहाण करीत ४ महीलावर सामुहिक बलात्कार केला होता.याच दिवशी गावातील अनेकांना जबरदस्त मारहाण केली होती.आणि त्या काळात किंमत असलेले ४४ हजार ३५ रुपये किंमतीचे दाग दागिने लुटून नेले होते.आणि जाताना घरातील कपडे पेटवून देऊन तेथे असलेल्या तरुण आणि वृद्ध महिलांवर अत्याचार केले होते.या अतिशय गलिच्छ आणि मानवतेला काळिमा फासणाऱ्या या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता व राज्यभर सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणी राज्यात आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत ही आवाज उठवण्याचे काम सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन केले होते. त्यावेळी या प्रकरणांतील सर्व आरोपीच्या अटकेची मागणी करून सरकारला चांगलेच धारेवर धरत सरकारच्या राजिनाम्याची मागणी केली होती.मग तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने कोठेवाडी येथिल घटनास्थळास भेट देवून पोलीसांना आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.नाशिक विभागाचे विषेश पोलिस महा निरीक्षक हे कोठेवाडी येथे तपासा साठी येऊन तळ ठोकून बसले होते.अहमदनगर,बीड,औरंगाबाद, जिल्ह्यातील अनेक वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले होते.तेथुन काही आरोपी तर वैजापूर येथुन काही अशा एकूण ८ संशयित आरोपींना अटक केली होती.चार पाच जणांना नंतर उशिरा अटक केली होती.काही आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांना सोडून देण्यात आले होते. एकूण १३ आरोपीवर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.तत्कालिन अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायाधीश ज्योती फणसाळकर – जोशी यांनी सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.या खटल्याचे सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले होते.संपुर्ण महाराष्ट्रात या अतिशय भयानक रीत्या गाजलेल्या खटल्यानेच उज्ज्वल निकम यांना चांगलेच प्रसिद्धीच्या झोतात आणले होते. या शिक्षा भोगत असलेल्या आरोपींनी राज्यातील अनेक जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात
औरंगाबाद येथील विषेश न्यायालयात त्यांच्यावर (मोक्का)संघटीत गुन्हेगारी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.औरंगाबाद येथील विषेश मोक्का न्यायालयात पुन्हा या खटल्याची सुनावणी झाली. न्यायालयाने मोक्का कलम ३(१),(२) अन्वये अंतर्गत एकूण १३ आरोंपींना १२ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी ५ लाख रुपये दंड व तो न भरल्यास आणखी २ वर्षे सक्तमजुरी, आणि मोक्का कायद्याच्या कलम ३(४),कलमान्वये सर्व आरोपींना १० वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी ५ लाख रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी २ वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती.मात्र सर्व आरोपींनी मोक्का न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.त्यावर पुन्हा नव्याने सुनावणी पूर्ण होऊन उच्च न्यायालयाने मोक्का न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरविला होता.कायद्याच्या चौकटीत राहून पोलीसांनी तपास करीत असताना त्यांना या आरोपींनी पाथर्डी,वैजापूर, गंगापूर तालुक्यात ही दरोडा, मारहाण, बलात्कार, सामुहिक बलात्काराची अनेक गुन्हे केलेले असल्याने औरंगाबाद येथील मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस एस गोसावी यांनी डिसेंबर २०१६ मध्ये या गुन्ह्यातील १३ आरोंपींना १२ वर्षे सक्तमजुरीची व प्रत्येकी दहा लाखांचा दंड असा एकूण १ कोटी ३० लाखाचा दंड ठोठावला होता.सर्व आरोपी तर्फे या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते.३ ऑगष्ट २०२१ रोजी न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी निकाल दिला होता की या आरोपींच्या विरोधात लावलेले मोक्का कायद्यातील कलम येथे लागू पडत नाहीत.आरोपींनी अनेक गुन्हे केले असल्याचे सरकार पक्षाचे म्हणणे असले तरी कायद्याच्या व्याख्येनुसार ते संघटीत गुन्हेगारी असल्याचे सिध्द होउ शकले नाही त्यामुळे आरोपीची सुटका करण्यात येत आहे असे निकाल पत्रात म्हटले आहे.कोठेवाडी दरोडा अत्याचार प्रकरणातील सर्व आरोपी हे पुढील प्रमाणे होते.१) दारासिंग ऊर्फ मारुती वकिल्या भोसले (तत्कालीन वय २८ वर्षे), राहणार धामणगाव, तालुका आष्टी जिल्हा बीड,२) रमेश ऊर्फ रेच्या धुपाजी काळे,(वय ३२ वर्षे),राहणार ब्राह्मणगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड,३) बंडू उर्फ बबन भोसले,(वय३० वर्षे), राहणार, वाळुंज,तालुका, जिल्हा, अहमदनगर,४) हबीब उर्फ हब्या पानमळ्या भोसले,(वय३०वर्षे), राहणार साबलखेड, तालुका आष्टी, जिल्हा बीड,५)गारमन्या खुबजत चव्हाण (वय ३४वर्षे), राहणार शेरी, तालुका आष्टी, जिल्हा बीड,६)राजू उर्फ अंदाज वकिल्या भोसले (वय २५वर्षे),राहणार धामणगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड,७)उमऱ्या घनशा भोसले, (वय३७ वर्षे), राहणार चिखली, तालुका आष्टी, जिल्हा बीड,८)रसाळ्या डींग्या भोसले (वय ३०वर्षे), राहणार चिखली, तालुका आष्टी,जिल्हा बीड,९) संतोष उर्फ हरी डिस्चार्ज काळे,(वय२५वर्षे), राहणार हिवरखेड, तालुका आष्टी, जिल्हा बीड,१०)चिकू उर्फ चिक्या सरमाळ्या भोसले (वय ३५वर्षे), राहणार वाळुंज, तालुका आष्टी, जिल्हा बीड,११) सुरेश उर्फ तिर्थ्या चिंतामण काळे, (वय २१वर्षे), राहणार शेरी, तालुका आष्टी, जिल्हा बीड,१२) हनुमंता नकाशा भोसले (वय २५ वर्षे),राहणार पिंपरखेड, तालुका आष्टी,जिल्हा बीड,१३)एक अल्पवयीन मुलगा असे एकूण सर्वं आरोपी होते.या सर्व आरोपींनी दरोडा टाकला होता त्यावेळी सर्व आरोपी अंगात “सुरेश धस मित्र मंडळ” हे नाव असलेले बनियन घालून आले होते.तसेच या सर्व आरोपीची कारागृहातून सुटका झाली त्यावेळी त्या आरोपींना घरी घेऊन जाण्यासाठी कारागृहा बाहेर सुरेश धस यांची गाडी हजर होती हे लोकांनी प्रत्यक्ष पाहिले होते.अशा या कोठेवाडी प्रकरणाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या प्रकरणास १७ जानेवारी रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत.दरोडा टाकून अत्याचार झाला त्यावेळी पाथर्डीचे जेष्ठ पत्रकार अविनाश मंत्री यांनी सकाळ या वृत्तपत्रात बातम्या छापून या प्रकरणाला संपूर्ण राज्यभर प्रसिद्धी मिळवून दिली होती.

























