Home महाराष्ट्र मुळा पाटबंधारे विभागाच्या मुख्य चारीला जवखेडे खालसा येथे घळ पडल्याने पाटाचे पाणी...

मुळा पाटबंधारे विभागाच्या मुख्य चारीला जवखेडे खालसा येथे घळ पडल्याने पाटाचे पाणी वाया, शेतकऱ्यांच्या शेतात पाटाचे पाणी घुसल्याने नूकसान ग्रस्त शेतकरी हवालदिल ?

मुळा पाटबंधारे विभागाच्या मुख्य चारीला जवखेडे खालसा येथे घळ पडल्याने पाटाचे पाणी वाया, शेतकऱ्यांच्या शेतात पाटाचे पाणी घुसल्याने नूकसान ग्रस्त शेतकरी हवालदिल ?

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मुळा पाटबंधारे विभागाच्या शाखा कालव्याला ५ जानेवारी २०२६ पासून पिकासाठी आवर्तन सोडण्यात आले होते.नेवासा, शेवगाव,पाथर्डी ,या तालुक्यातील शेतकऱ्यांना या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार होता.परंतू अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा, येथील शिवारात पाणी येताच जवखेडे-देडगाव रस्त्यावर असलेल्या पाटावरील नाल्यांचे दोन दिवसापुर्वी सिमेंट काॅंक्रेटने पुनर्बांधणीचे काम करण्यात आले होते.नविन आणि ताजे बांधकाम असल्यामुळे आणि वेगाने आलेल्या पाण्याच्या वजनामुळे त्याठिकाणी असलेल्या सिमेंटच्या प्लेटा तुटून पडल्या आणि पाटचारीला घळ पडताच पाटाचे पाणी ओढ्याच्या दिशेने वाहून गेले. पाटातील हे पाणी जवखेडे शिवारातील मतकर पट्टी,गोगड मळा,वाघोली शिवारातील दातीरपट्टी,कोपरे शिवारातील आव्हाडांचा वरचा मळा यांच्या शेतातुन पुढे आल्हाट वस्तीतून थेट वडुले -वाघोली नदीला येऊन मिळाले होते.जवखेडे, कोपरे,वडुले, वाघोली या शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने तूर,कांदा,मका, घास,गहू,हरबरा,या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तेथे पावसामुळे अगोदरच्या हंगामात फार मोठे नुकसान झाले होते.आता त्याच ठिकाणी पाटाचे पाणी शिरल्याने शेतकरी हातघाईला आलेले आहेत.सरकारी कर्मचारी यांनी नुकसान झालेल्या पिकाचे त्वरित पंचनामे करावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. महसूल अधिकारी आणि पाटबंधारे विभागाचे अधीकारी यांच्या मध्ये समन्वय साधून शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की या पाटावरील नाल्यांचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. नेवासा तालुक्यातील ठेकेदारांना हे काम देण्यात आले होते.पण त्यांनी पाटाला पाच तारखेलाच पाणी सुटले म्हणून अत्यंत घाईघाईने हे काम केल्यामुळे कामाच्या गुणवत्तेचा दर्जा घसरला आणि दोन दिवसांपूर्वीच केलेल्या कामाला पाटात मोठं भगदाड पडून पाटबंधारे विभागाचे काही क्युसेस पाणी वाया जाऊन पाण्याचे नुकसान झाले.या कामाची वरीष्ठ पातळीवरून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्या कडून करण्यात येत आहे.असे गुणवत्ता हीन दर्जाचे काम होत असल्याने पाटबंधारे विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील मॅडम यांनी कामात लक्ष घातले पाहिजे.अशी नूकसान ग्रस्त शेतकऱ्याची मागणी आहे.पुन्हा नव्याने संपुर्ण काम झाल्या शिवाय सदर ठेकेदाराची बीले अदा करण्यात येऊ नये अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. पाथर्डीचे तहसिलदार उद्धव नाईक,मंडल अधिकारी कटारनवरे, तलाठी घोडतळे,सरपंच चारुदत्त वाघ पाटील,सदस्य अमोल मतकर, राहुल मतकर, विलास मतकर यांनी या फुटलेल्या पाटाची पाहणी केली आहे.पाटाचे काम जलद गतीने सुरू व्हायला पाहिजे होते पण तसे झाले नाही म्हणून तर या पाटाच्या पाण्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मुळा पाटबंधारेच्या अमरापूर विभागाचे शाखा अभियंता संदिप केरूबापू शेळके साहेब यांनीही या कामास भेट देऊन या पाटफुटीची पाहणी केली आहे.पाट त्वरित दुरुस्त केला जाईल आणि पाणीपुरवठा सुरळीत चालू होईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

Don`t copy text!