नवरात्र उत्सवानिमित्त मोफत “डिजिटल सहेली” कोर्सचे आयोजन
भाटेपुरी ( श्री महेंद्र बेराड तालुका प्रतिनिधी):
नवरात्र उत्सवाच्या शुभप्रसंगी भाटेपुरी येथील रुक्मिणी कॉम्प्युटर्स तर्फे महिलांसाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत महिलांना मोफत “डिजिटल सहेली” कोर्स देण्यात आला.
या कार्यक्रमाला परिसरातील सर्व अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रुक्मिणी कॉम्प्युटर्सच्या Learning Facilitator सौ. उषा सुरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला.
महिलांना डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात तसेच कामकाजात माहिती तंत्रज्ञानाचा वापर सोयीस्कर होणार आहे. यावेळी विद्यार्थिनींना AI Tools, ChatGPT, Gemini App यांची माहिती देऊन त्यांचा दैनंदिन वापर कसा करता येईल याविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर Cyber Security व सुरक्षित इंटरनेट वापराबाबतही उपयुक्त माहिती देण्यात आली.

























