श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे कर्तव्यपूर्ती सोहळा संपन्न

श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे कर्तव्यपूर्ती सोहळा संपन्न

 

 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो.से. हायस्कूल पाचोरा येथे तांत्रिक विभाग प्रमुख श्री.एस.एन. पाटील सर व ज्येष्ठ विज्ञान शिक्षिका सौ. मुक्ता किरण पाटील मॅडम(कोहक मॅडम)आज गुरुवार दि. 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे कर्तव्यपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हाईस चेअरमन मा. नानासो.श्री. व्ही.टी.जोशी हे होते, तर संस्थेचे चेअरमन मा.नानासो. श्री संजय वाघ, शालेय समिती चेअरमन मा. दादासो.श्री.खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन मा.अण्णासाहेब श्री. वासुदेव महाजन, ज्येष्ठ संचालक मा. आप्पासो.श्री.सतीश चौधरी, मा. दादासो.श्री.अर्जुनदास पंजाबी, शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री. एस.एच.पवार सर, श्री. सुधीर पाटील सर, सौ.पी.एम वाघ मॅडम, श्री.ए.जे.महाजन सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री.एन.आर. ठाकरे सर, उपमुख्याध्यापक श्री. आर.एल.पाटील सर यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. श्री.रुपेश पाटील सर व श्री.सागर थोरात सर यांनी ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात केली.

संस्थेचे चेअरमन मा. नानासाहेब श्री.संजय वाघ यांच्या हस्ते श्री.एस.एन.पाटील सर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

. शालेय समिती चेअरमन दादासो. श्री.खलील देशमुख यांच्या हस्ते सौ. मुक्ता पाटील मॅडम व त्यांचे पती मा.श्री. किरण पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

संस्थेचे वरील सर्व सन्माननीय पदाधिकारी, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक यांनी श्री.एस एन.पाटील सर व सौ. मुक्ता पाटील मॅडम यांनी गो.से. हायस्कूल मध्ये केलेल्या प्रदीर्घ सेवेबद्दल व त्यांनी शाळा व संस्थेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले तसेच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या.

. . सत्कारास उत्तर देताना वरील सत्कारमूर्तींनी संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व संचालक मंडळ तसेच शाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले.

… या कार्यक्रमास पर्यवेक्षिका सौ.ए.आर.गोहिल मॅडम, श्री. आर.बी.तडवी सर, श्री.आर.बी. बांठीया सर, किमान कौशल्य विभाग प्रमुख श्री. मनीष बाविस्कर सर,सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.एम.टी.कौंडिण्य सर, क्रीडा प्रमुख श्री.एस.पी.करंदे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी तसेच निवृत्त होणाऱ्या सहकाऱ्यांचे कुटुंबीय व मित्रपरिवार उपस्थित होता.

.

.. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आर. बी. बोरसे सर व आभार प्रदर्शन श्री. उज्वल पाटील सर यांनी केले.