ना.धनंजय मुंडे यांच्या विरोधात असंविधानिक वक्तव्य करून बदनामी केली म्हणून मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल

ना.धनंजय मुंडे यांच्या विरोधात असंविधानिक वक्तव्य करून बदनामी केली म्हणून मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) परभणी शहरात दिनांक ४ जानेवारी रोजी दुपारी कै.सुर्यवंशी आणि मयत संतोष देशमुख यांच्या हत्ये संदर्भात सर्व पक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला होता.त्या निषेध मोर्चातील जाहीर सभेत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठ्या आवेशात बोलताना “ह्या मुंड्या फुंड्याच नाव सुद्धा घेतले नाही, हरामखोर अवलादीचे “असे ना.धनंजय मुंडे यांच्या बद्दल बदनामी कारक आणि असंविधानिक वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण केली म्हणून मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात परळीत पोलिस स्टेशनमध्ये तुकाराम बाबुराव आघाव (वय ३२) राहणार परळी वैजनाथ यांनी फिर्याद दाखल केली आहे. परळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ०२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३५६(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणीतील जाहीर निषेध सभेत जरांगे पाटील यांनी पुढे असेही वक्तव्य केले होते की मस्सा जोग गावचे मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना जर कोणी धमकी दिली तर रस्त्यावर दांडके घेऊन उतरू आणि “धनंजय मुंडे यांना घरात घुसून मारू रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही”.संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचे चार्जशीट लवकरात लवकर कोर्टात गेले पाहिजे जर कोणी आरोपी बाहेर राहीला तर “मंत्री मुंडेना गोट्याने हाणू “असे वक्तव्य करून नामदार धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष धमकीवजा इशारा दिला होता. यामुळे मुंडे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.त्यामुळे ते जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करीत ठाणे आणि पुणे येथे ही मुंडे समर्थक हे जास्त प्रमाणात आक्रमक झाले आहेत. संपूर्ण राज्यभर मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे वक्तव्य मुंडे समर्थक ठिक ठिकाणी झालेल्या जाहीर सभेत करीत आहेत.संपूर्ण राज्यभर जातिय सलोखा निर्माण होण्याची चिन्हे काही दिसत नाही तर दोन समाजात कमालीची तेढ निर्माण झाल्याचे चित्र संपूर्ण राज्यभर दिसून येत आहे. यामध्ये तेल ओतून काही आमदारही चिथावणीखोर भाषण करून दोन समाजात तेढ निर्माण करीत आहेत.महाराष्ट्राच्या पोलिसांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वतो परी डोळ्यात तेल घालून पहारा करून समाजात शांतता निर्माण करावी असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात केले आहे. संपूर्ण राज्यभर वंजारा विरुद्ध मराठा हा संघर्ष निर्माण झाल्याचे चित्र दिसुन येत आहे.राज्यातील नेत्यांनी शिष्टाई करून दोन्ही समाजातील कार्यकर्त्यांनी शांतता राखावी आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदारांना वेसन घालून शांत करावे तरच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील असे सर्व सामान्य नागरिकांचे मत बनले आहे.