पाचोऱ्यात प्रभाग क्रमांक 13 शिव कॉलनी सह परिसरात चेंबर झाले आहेत जिव घेणे प्रशासन लक्ष देण्याची नागरिक करता आहे मागणी

प्रभाग क्रमांक 13 शिव कॉलनी सह परिसरात नगरपालिकेने रस्त्यांचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून सर्वदूर चेंबर खड्डे उंच करण्यासाठी मोकळे केले आहेत किमान आठ दिवसापासून खड्डा मोकळा करण्याशिवाय कुठलेच काम झाले नाही हे खड्डे अतिशय जीवघेणे पद्धतीचे व घातक ठरत आहेत बरेच लोक या खड्ड्यांमुळे आदळले,पडले . एक तर रस्त्याची कमालीची दुरवस्था त्यात खड्ड्यांची करामत आधीच कृष्णापुरी चा मुख्य रस्ता बंद असल्यामुळे सर्व वर्दळ या परिसरात आहे. सध्या भिक नको पण कुत्रा आवर अशी स्थिती आहे रस्ता भले करू नका पण निदान जे खड्डे कोरलेले आहेत ते बुजवा किंवा लवकरात लवकर काम करा अशी प्रशासनाला विनंती या विषयाची गंभीर दखल घेऊन हा विषय मार्गी लावण्यात सहकार्य करावे ही अपेक्षा