गावच्या जत्रेत सत्तूर,काठी,सुरीच्या तुफान हाणामारीत एकाचा म्रुत्यु,पोलिस ठाण्यात पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल !

गावच्या जत्रेत सत्तूर,काठी,सुरीच्या तुफान हाणामारीत एकाचा म्रुत्यु,पोलिस ठाण्यात पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल !

(सुनिल नजन”चिफ ब्युरो”/अहमदनगर जिल्हा स्पेशल क्राईम रिपोर्टर) गावची यात्रा म्हणजे गावातील समाज कंटकांचे उणेदुणे काढण्याचे ठिकाण झाल्याचे अनेक गावातील घडलेल्या घटनेवरून सिद्ध झाले आहे.अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे दिनांक 2मे रोजी माता लक्ष्मी देवीची यात्रा होती. त्या यात्रेत छबिना मिरवणूक सुरू असताना छेडछाडीच्या कारणांमुळे दोन गटात तुफान हाणामारी झाली.सत्तूर, काठ्या, सुरी,लोखंडी राँड यांचा राजरोसपणे वापर करण्यात आला. मारहाणीत एकाचा म्रुत्यु झाला असुन पाच जणाच्या विरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावच्या यात्रेला गालबोट लागल्याने दुसऱ्या दिवशी होणाऱ्या हजेरी आणि कुस्त्यांचा जंगी हंगामा गावात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून पोलीसांनीच रद्द केला.या बाबदची घटना अशी की शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी गावात लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त दोन मे रोजी छबिना मिरवणूक काढण्यात आली होती.या मिरवणुकीत जुण्या काहीतरी छेडछाडीच्या वादावरून सात आठ जणांनी कटकारस्थान रचून गावातील अक्षय संजय अपशेटे वय वर्षे (24) याला लाथाबुक्यां सह सत्तूर, काठी, सुरीने जोरदार मारहाण केली.या तुफान हाणामारीत अक्षय संजय अपशेटे याच्या डोक्यात, कानाखाली,उजव्या मांडीवर, झालेल्या जखमेतून जास्त प्रमाणात रक्तश्राव होत होता म्हणून गावातील सामाजिक कार्यकर्ते ओंकार काकडे, अरुण लोखंडे, नितीन गिरमे यांनी तातडीने प्रथमोपचारा साठी गावातील डॉक्टर राजळे यांच्या दवाखान्यात नेले असता त्यांनी पेशंटची परीस्थिती अतिशय गंभीर असल्याने गावातील नागनाथ देवस्थान ट्रस्टच्या रुग्ण वाहीकेतून शेवगाव येथे पुढील उपचारासाठी सरकारी दवाखान्यात पाठविले.उपचार सुरू असतानाच रात्री 11:50 च्या सुमारास अक्षय अपशेटे याचा म्रुत्यु झाला. या बाबत मयताचे भाऊ संकेत संजय अपशेटे वय वर्षे(28)यांनी संशयित आरोपी 1)अजय दाविद कोल्हे,2)विकास संजय कोल्हे,3)पंकज लक्ष्मण कोल्हे,4)किरण उत्तम चव्हाण,5)अविनाश साईनाथ पवार यांच्या विरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात भा.द.वी.कलम 302,143,147,148, 149,149,323 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. उतरीय तपासणी नंतर म्रुतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी शहरटाकळी गावात येताच जो पर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही तो पर्यंत म्रुतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतल्याने गावात प्रचंड प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. परंतु शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी फरार झालेल्या आरोपींच्या लवकरच मुसक्या आवळून कोर्टात हजर करण्याचे आश्वासन दिल्याने गावातील तणावाचे वातावरण निवळले. पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत मयतावर मोठ्या शोककूल वातावरणात सुर्यास्तानंतर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांच्या अतिरिक्त फौजफाट्या मुळे गावात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यास फार मोठी मदत झाली.प्रत्येक गावातील यात्रा या समाजकंटकाचे उणेदुणे काढण्याचे ठिकाण बनल्या आहेत. जिल्हा पोलिस उप अधिक्षक सुनिल पाटील यांनी तातडीने या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिस प्रशानाला योग्य सुचना दिल्या आहेत.या खुन प्रकरणामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.