Home महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी आनंद जीवने उर्फ पृथ्वीराज पाटील यांची निवड करण्यात...

शेतकरी संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी आनंद जीवने उर्फ पृथ्वीराज पाटील यांची निवड करण्यात आली

शेतकरी संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी आनंद जीवने उर्फ पृथ्वीराज पाटील यांची निवड करण्यात आली

लातूर येथील अंजनी हॉटेलमध्ये 11 मार्च रोजी सकाळी 11 ते 3 यावेळेस शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणी व मराठवाडा कार्यकारणी व जिल्हा कार्य करनी बैठक संपन्न झाले महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील विविध पदाच्या पदाधिकारी सर्वानुमते निवड करण्यात आले वरिष्ठ यांच्या हस्ते निवडी करण्यात आले व तसेच उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडी पदे देण्यात आले संघटनेचे स्वागत करून आनंद जीवने उर्फ पृथ्वीराज पाटील यांची मराठवाडा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आले व मराठवाडा संपर्क प्रमुख म्हणून महादेव कोठे यांचे निवड करण्यात आले व सेच जिल्हा उपाध्यक्ष म्हणून श्रीमंत अण्णा लुले व योगेश तगरखेडे जिल्हा कार्याध्यक्ष व देवणी तालुका अध्यक्ष दत्ता अर्जुने, तालुका संघटक शंकर बावचे.,कार्याध्यक्ष बालाजी लासुने, जिल्हा सरचिटणीस पप्पू सावंत,करीम भाई शेख यांची देवणी तालुका उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आले याप्रसंगी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष कालिदास आपेट व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुरेंद्र अंबुलगे व तसेच मार्गदर्शक दगडू पडले सर यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देण्यात आले या बैठकीस सूत्रसंचालन दत्तात्रय लोभे यांनी केले तर जिल्हाध्यक्ष यांनी आभार मानले या बैठकीला महाराष्ट्र राज्यातून व लातूर जिल्ह्यातून सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Don`t copy text!