Home जळगाव धरणगाव महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा 

धरणगाव महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा 

धरणगाव महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
आपल्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त” वाचन प्रेरणा दिनाचे” औचित्य साधून वाणिज्य व अर्थशास्त्र  मंडळामार्फत वाणिज्य व अर्थशास्त्र संशोधन पद्धती या विषयावर डॉ जगतराव धनगर यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे  सर   मा प्राचार्य डॉ एस बी शिंगाणे  अध्यक्षतेखाली कार्यक्रम साजरा केला. याप्रसंगी IQAC समन्वयक प्रा एस. एस. पालखे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
 कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन डॉ ज्योती पी. महाजन यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गौरव जी. महाजन यांनी केले. यामध्ये त्यांनी वाणिज्य व अर्थशास्त्र मंडळाचा उद्देश व अशा कार्यक्रमांचा फलित भविष्यात विद्यार्थ्या संशोधनाची गरज अशा बाबींवर प्रकाश टाकला.
 कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अहमदाबाद येथे सध्या कार्यरत असलेले डॉ. जगतराव धनगर यांनी वाणिज्य व अर्थशास्त्र संशोधन पद्धती यावर आपले विचार व्यक्त करताना संशोधन म्हणजे काय संशोधन नेमके कसे करावे याचे सुरुवात समस्या शोधन पासून ते निष्कर्षापर्यंत क्रमबद्ध पद्धतीने विविध टप्प्यांमध्ये अध्ययन कसे करावे या संदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोगत माननीय प्राचार्य डॉ एस. बी. शिंगाणे यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ. हर्षवर्धन भालेराव यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  सहकार्य केले.
Don`t copy text!