वाचक जेव्हा लिहितात रंधा :- भाऊसाहेब मिस्तरी
गुरु पौर्णिमेच्या दिवशी मी माझे अत्यंत जवळचे लेखक आणि कवी देवा झिंजाड सरांच्या व्हाट्सअप वरती रंधा कादंबरी संदर्भात पोस्टपाहिली होती.देवा सरांची पोस्ट बघून मला कादंबरी संदर्भात उत्सुकता निर्माण झाली आणि मी लगेच ती बुकगंगा वरून ऑनलाईन मागवली. योगायोगाने ती मला शनिवारीच मिळाली म्हणजे मला रविवारचा पूर्ण दिवस कादंबरी वाचण्यात देता येणार होता, आणि मला त्या संदर्भात आनंदही झाला होता.
रंधा कादंबरी वाचायला घेण्या
अगोदर कादंबरीचा मुखपृष्ठ आणि मागील पानावरील आशय वाचूनच कादंबरीची उत्सुकता अधिक वाढायला लागली आणि रविवारी सकाळीच लगोलग कादंबरी वाचायला घेतली.
कादंबरी पहिल्या पानापासूनच खऱ्या अर्थाने ग्रामीण जीवनाचे वर्णन आणि ग्रामीण भाषेवरती भाष्य करायला सुरुवात करते आणि शेवटपर्यंत ग्रामीण जीवनाचा प्रवाह सोडायला लेखक तयार नाही.
ग्रामीण भागात जुन्या काळामध्ये 18 पगड जाती एकत्र येऊन सर्व समाज गुण्या गोविंदाने राहत होता नांदत होता .अशाच एका सुतार कुटुंबाची संघर्षाची कहाणी लेखकांनी वाचकांसमोर मांडलेली आहे.
ग्रामीण जीवनाचे वास्तव दर्शन घडवणारी ही कादंबरी असून लेखकांने ग्रामीण जीवनातील दुःख ,दारिद्र्य, ग्रामीण जीवनाचे वर्णन वाचकांच्या डोळ्यासमोर वास्तव रूपात पेश केलेला आहे.
अण्णा मिस्तरी यांच्या कुटुंबाची ही कथा आहे. लेखक , त्यांचेअण्णा, ताई आणि भाऊ यांच्यावर आलेल्या वेगवेगळ्या
संघर्षाची कहाणी पदोपदी जाणवत राहते .त्यातूनही मार्ग काढत पारंपारिक व्यवसायिक , रोजनदारी, कामधंदा ,सालीरीती परंपरा जपल्या जातात .
हा प्रवास जरी संघर्षाचा असला त्यातूनही मार्ग काढता येतात आणि आयुष्य सुखकर करता येतं .लेखकाने ग्रामीण भागातील केलेले वर्णनाने ही कादंबरी वाचकांच्या हृदयाच्या जवळ जाऊन मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही
आणि प्रत्येक वाचकालाही हि आपली कथा वाटायला लागते.
कादंबरी वाचत असताना
कधी हसवते तर डोळ्यांच्या कडा
ओल्या झाल्याशिवाय राहत नाही.
जशी जशी कादंबरी
पुढे वाचत जातो तसं तसं एक एक पात्र लेखकाने आपल्यासमोर मांडलेले आहे .
या कादंबरीतील प्रत्येक व्यक्ती आपल्याला आपलं करून टाकल्याशिवाय राहत नाही.आपण कधी कादंबरीमय होऊन जातो हे आपल्यालाच कळत नाही.कादंबरी वाचत असताना जमिनीवरती कादंबरी ठेऊच नाही असं वाटत राहतं. सतत वाचत राहावं अशा प्रकारची ही ग्रामीण लेखकाची कादंबरी आहे ,आणि हेच कादंबरीचं खऱ्या अर्थाने
श्रेय आहे…
ग्रामीण जीवनावरती एवढा सखोल आणि सूक्ष्म अभ्यास आजपर्यंत माझ्या तरी वाचनात आलेला नाही.आनंद यादवांच्या झोंबी या कादंबरी सारखच पहिल्या धारेचे लेखन आहे.खूप खूप बारीक गोष्टींचा भाऊसाहेब मिस्तरी यांनी विचार केलेला आहे आणि त्यांच्या लेखनातून तो जाणवत राहतो त्याचे एकमेव कारण मला असं वाटतं की गावगाड्यावर आणि आपल्या मातीवर नितांत प्रेम करणारा माणूसच असे लिहू शकतो.या ठिकाणी ही गोष्ट मला नमूद करूशी वाटते.
भाऊसाहेब मिस्तरी यांच्या
जीवनाची संघर्षाची कहाणी जरी असली तरी
त्यातील प्रत्येक गोष्ट आपल्याला आपली येणाऱ्या भविष्यकाळात नक्कीच ऊर्जा देऊन जाते आणि म्हणून प्रत्येक वाचकाने ही कादंबरी एकदा तरी वाचावी .
येणाऱ्या काळामध्ये साहित्य क्षेत्रात नक्कीच या कादंबरीची दखल घेतली जाईल
आणि येणाऱ्या वर्षांमध्ये
भाऊसाहेब मिस्तरी हे ग्रामीण लेखक म्हणून नावारूपाला येतील यात मला शंका वाटत नाही..
झालेली सेवा समाप्त करतो आणि माऊली चरणीअर्पण करतो…येणाऱ्या काळामध्ये भाऊसाहेब मिस्तरी यांच्या हातून आणखीन चांगल्या प्रकारचे लेखन होवो
ही साई चरणी प्रार्थना
आणि सदिच्छा🙏
आपलाच …..
सुनील सूर्यभान तांबे
मोशी पुणे..
भ्रमणध्वनी क्रमांक
9552370832