सौ सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालयात शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा
भडगाव:- येथील सौ सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालयात शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जून जुलै २०२६ ची बैठक व्यवस्था डी ०० ३५६४
ते डी ००३७५१ व डी ०४००१५७ केंद्र क्रमांक ३७१५ वर घेण्यात येणार आहे.सदर परीक्षेस पुनर्परीक्षार्थी,सर्व विषय घेऊन बसणारे विद्यार्थी पात्र आहेत.या परीक्षेस तालुक्यातून १३८ विद्यार्थी प्रविष्ट असून परीक्षा केंद्रसंचालक एस पी सोनवणे तर उपकेंद्रसंचालक प्रा. प्रशांत सी पाटील,सहाय्यक परिरक्षक प्रा.तुषार माळी कामकाज पाहणार आहेत.विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता परीक्षा द्यावी.तसेच पेपर संपल्यानंतर तोंडी परीक्षा,प्रॅक्टिकल परीक्षा आवेदन पत्र भरलेल्या शाळेतच द्यावी असे आवाहन उपकेंद्रसंचालक प्रा. प्रशांत सी पाटील यांनी केले आहे.असे प्रसिद्धीप्रमुख प्रा.एल के वाणी कळवितात.





















