Home महाराष्ट्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली म्हणून गाव गुंडांकडून मारहाण,लहान बालिकेवर...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली म्हणून गाव गुंडांकडून मारहाण,लहान बालिकेवर ॲसीड फेकले,आरोपींना अटक करण्या साठी भोकरदन येथे ५ जून रोजी भव्य राज्यव्यापी आंदोलनाचे आयोजन

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली म्हणून गाव गुंडांकडून मारहाण,लहान बालिकेवर ॲसीड फेकले,आरोपींना अटक करण्या साठी भोकरदन येथे ५ जून रोजी भव्य राज्यव्यापी आंदोलनाचे आयोजन

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३१ मे रोजी जयंती साजरी केली म्हणून गोद्री, तालुका, भोकरदन,जिल्हा जालना येथे काही मुस्लिम समाज कंटकांनी गावातील तरूणांना बेदम मारहाण केली, लहान बालिकेवर ॲसीड फेकले,या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आणि झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भव्य रास्ता रोको आणि राज्यव्यापी ठीय्या आंदोलन करण्यात येणार आहे.या आशयाचे निवेदन भोकरदन पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले आहे.या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की गोद्री,तालुका भोकरदन,जिल्हा जालना येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करीत असताना गावातील काही मुस्लिम समाजातील गाव गुंडांनी जयंती साजरी करणाऱ्या लोकावर भ्याड हल्ला करून अनेक तरूणांना चाकू,सुरा, कोयता,तसेच ईतर घातक शस्त्राने मारून जायबंदी केले आहे.तसेच एका लहान बालिकेवर ॲसीड फेकून तीला अश्लील भाषेत शिविगाळ केली.”इस लोगोको काफी रोको,काटो”असे चिथावणी खोर वक्तव्य करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी म्हणून दिनांक ५ जून २०२६ रोजी भोकरदन येथिल शिवाजी महाराज चौकात भव्य रास्ता रोको आणि ठीय्या आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात धनगर समाजाचे राष्ट्रीय नेते दिपक भाउ बोर्हाडे, आमदार गोपिचंद पडळकर,मंत्री नितेश राणे, अहिल्यानगर चे आमदार संग्राम जगताप,सकल हिंदू समाजाचे नेते ह.भ.प.संग्राम बापू भंडारे, धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते घनःश्याम हाके,शारदाताई पांढरे,भाजपाचे ओबीसी सेलचे जालना जिल्हा अध्यक्ष कपिलजी दहेकर, सामाजिक कार्यकर्ते बळीराम खटके,ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज शेलुदकर,ह.भ.प. विष्णू महाराज सास्ते,ह.भ.प. संतोष महाराज अढावणे हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत.तसेच या आंदोलनात भोकरदन तालुक्यातील आणि जालना जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.तरी राज्यातील धनगर समाजातील अहिल्याप्रेमीं भक्तांनी सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.भविष्यात धनगर समाजाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हींमत कोणी करणार नाही असा धडा आता या समाज कंटकांना शिकवला जाणार आहे.

Don`t copy text!