कोसगाव येथील सोनाली काथार यांची ठाणे पोलीस पदी निवड
भोकरदन/ महेंद्र बेराड: भोकरदन तालुक्यातील कोसगाव येथील सोनाली दिगंबर काथार यांची ठाणे पोलीस पदी निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या यशामुळे काथार कुटुंबासह संपूर्ण कोसगाव परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सोनाली काथार यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले असून ग्रामीण भागातील मुलींसाठी त्यांनी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. त्यांच्या यशाबद्दल गावकऱ्यांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
यावेळी अभिनंदन सोहळ्याला गावचे सरपंच अशोक पाटील शिंदे, विठ्ठल अंभोरे, संतोष काथार, बालाजी काथार, दिगंबर काथार, पांडुरंग कारभार, डॉ. राजेश उंबरकर तसेच गावातील इतर मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती भोकरदन तालुका अध्यक्ष तथा दैनिक कलमवीरचे विशेष प्रतिनिधी सुनील उंबरकर हेही यावेळी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी सोनाली काथार यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

























