Home महाराष्ट्र पाथर्डी पोलिसाकडून गंठणचोर,व मोबाईल चोर अशा दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील दोन आरोपी गजाआड

पाथर्डी पोलिसाकडून गंठणचोर,व मोबाईल चोर अशा दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील दोन आरोपी गजाआड

पाथर्डी पोलिसाकडून गंठणचोर,व मोबाईल चोर अशा दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील दोन आरोपी गजाआड

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

पाथर्डी तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्त्यावरील महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र,गंठण ओरबाडून पळणारे आणि बस स्थानक परिसरात व बाजार तळावरील लोकांचे मोबाईल चोरणारे वेगवेगळ्या गुन्ह्यातील दोन सराईत गुन्हेगार पाथर्डी पोलिसांनी गजाआड केले आहेत.या बाबत पहिला गुन्हा हा दिनांक २८नोव्हेंबर २०२५ रोजी फिर्यादी राणी वसंत वारे,राहणार पाथर्डी या सायंकाळी डांबरी रस्त्याने फिरायला गेल्या असता आरोपीने त्यांच्या पाठीमागून येवून सौ.राणी वारे यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून नेले होते.या बाबद पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर १३२४/२०२५ , भारतीय न्याय संहितेचे कलम ३०४(२),३१०(२) या प्रमाणे दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाहोता. पाथर्डी पोलीसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या आधारे फरार आरोपी अजय पिराजी पवार,(वय वर्षे २०), राहणार माणिकदौंडी चौक, पाथर्डी यास धामणगाव रोडवर सापळा रचून अटक केली आहे.त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दुसरा गुन्हा पाथर्डी शहरातील बाजारतळ आणि बसस्थानक परिसरात गर्दीच्या ठिकाणी चोरी करणाऱ्या आरोपी कडून तिन लाख वीस हजार रुपये किंमतीचे सोळा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.या बाबद दिनांक ९ मार्च २०२६ रोजी सागर रावसाहेब बर्डे,राहणार निपाणी जळगाव, हे पाथर्डीच्या बाजारात चिंचा विकण्या साठी गेले असता त्यांच्या खिशातील २४००० रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता.या बाबद पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ५९७/२०२६ भारतीय न्याय संहितेचे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासून १)शुभम कचरु दिनकर,राहणार आंबेडकर नगर, पाथर्डी २) अलोक किरण ससाणे, राहणार,मेहेरबाबा टेकडी,पाथर्डी यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडे तपास केला असता आरोपी कडून फिर्यादी सह ईतर लोकांचे चोरी केलेले एकुण तिन लाख वीस हजार रुपये किंमतीचे सोळा मोबाईल पाथर्डी पोलीसांकडून जप्त करण्यात आले आहेत.सदरची ही कारवाई अहिल्या नगर जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब,शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू साहेब यांच्या मार्गदर्शना खाली पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब,उपनिरीक्षक विशाल लहाणे, पोलिस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब बडे, पोलीस नाईक भगवान गरगडे, पोलिस कॉन्स्टेबल सागर बुधवंत,ज्ञानेश्वर ईलग,संजय जाधव,ईजाज सय्यद,निलेश गुंड यांच्या पोलिस पथकाने केली आहे.पाथर्डी बस स्थानक परिसरात मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला आहे.हे भुरटे गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या बॅगा,पिशव्या,आणि किंमती सामान चोरून नेत होते.त्याला आता काही प्रमाणात आळा बसला आहे.

Don`t copy text!