Home पाचोरा तालुका खोट्या गुन्ह्याच्या आरोपामुळे तरुणाची आत्महत्या; सखोल चौकशीची मागणी

खोट्या गुन्ह्याच्या आरोपामुळे तरुणाची आत्महत्या; सखोल चौकशीची मागणी

खोट्या गुन्ह्याच्या आरोपामुळे तरुणाची आत्महत्या; सखोल चौकशीची मागणी

 

 

पाचोरा प्रतिनिधी

पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाने पुणे येथे रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे. संबंधित तरुणावर हॉटेलमध्ये चोरी केल्याचा खोटा आरोप करण्यात आला होता. या आरोपामुळे तो मानसिक तणावाखाली होता, अशी माहिती समोर आली आहे.

याशिवाय संबंधित व्यवस्थापनाकडून दबाव टाकणे, मारहाण करणे व शिवीगाळ केल्याचेही आरोप पुढे आले आहेत. या सर्व प्रकारामुळे संबंधित तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात होत असून, या घटनेमुळे गावात व परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नसून संपूर्ण समाजासाठी चिंतेचा विषय आहे. खोटे आरोप करून एखाद्याला मानसिक छळ देणे ही गंभीर व निंदनीय बाब असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच मृत तरुणाच्या कुटुंबास तात्काळ शासकीय मदत व न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.यावेळी सर्वं गावाकऱ्याच्या स्वाक्षरी होत्या.

Don`t copy text!