कासार पिंपळगाव येथे मुख्य रस्त्यावरील मुळा पाटबंधारेच्या पुलाचा कठडा तुटला,पाट खात्याच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष,जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी या कामात लक्ष घालण्याची प्रवाशांची मागणी
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
मुळा पाटबंधारे विभागाच्या कासार पिंपळगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथील हनुमान टाकळी रस्त्यावर असलेल्या मुळा पाटबंधारे विभागाच्या पाटावरील पुलाचे एका बाजूचे कठडे तुटले आहेत.हे कठडे मुळ जागेवरून दोन ते अडीच फूट बाजूला गेले आहेत.गेल्या सहा महीन्यापासुन हा कठडा थोडा थोडा तुटत होता.आता कोणत्याही क्षणी हा पुल कोसळेल आणि वित्त आणि जीवीत हाणी होउ शकते याची पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा जाणीव करून दिली होती परंतु अनेक वेळा जाणिव करुन देऊनही या पुलाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.जवखेडे हनुमान टाकळी रस्त्यावर असलेल्या मुळा पाटबंधारेच्या पुलाचे कठडे तुटले होते ते नव्याने काम पूर्ण करण्यात आले आहे.त्याच वेळी याही पुलाचे काम होणे आवश्यक होते परंतु ते झाले नाही.मुळा पाटबंधारे विभागाच्या चाऱ्यांचा गाळ काढण्याचे काम सुरू झाले होते तेव्हा मुळा पाटबंधारे विभागाचे अधिकारी काय झोपा काढत होते की काय असा सवाल नागरिक विचारत आहेत.मुळा पाटबंधारे विभागाचे अधिकारी नुसते उंटावरून शेळ्या हाकत आहेत.आणि अतिक्रमण झालेल्या शेतकऱ्यांना जुन्या नोटीसा देऊन छळत आहेत.त्यांनी एकदा येऊन प्रत्यक्ष या पुलाची पाहणी करून तातडीने या पुलाचे काम सुरू करावे अशी नागरिकांची मागणी आहे. या पुलावरून पाटात पडून काही नागरीकांचा बळी गेल्यानंतर गेंड्याची कातडी पांघरूण झोपेचं सोंग घेतलेले अधिकारी जागे होणार आहेत की काय अशी शंका नागरीका कडून व्यक्त करण्यात येत आहे.मुळा पाटबंधारे विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सायली पाटील मॅडम यांनी या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने कार्यवाही करावी आणि पावसाळ्यातील पुढील रोटेशन येण्या अगोदरच या पुलाचे काम सुरू करावे.सन १९७६ ते १९८० या कालावधीत या पुलाचे काम झाले होते.प्लॅन प्रमाणे काम झाले नाही म्हणून बोडसे साहेब यांनी त्यावेळी दोन वेळा हा पुल पाडून बांधण्यात आला होता.आता पन्नास वर्षे होऊन गेली आहेत.आता मात्र हा पुल शेवटच्या घटका मोजत आहे.जीवीत हाणी होण्याची शक्यता आहे. त्या अगोदरच हा पुल नव्याने बांधण्यात यावा तसेच या पुलाची रुंदी वाढवावी म्हणजे वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल.या विभागात नेमके कोण पाटबंधारे विभागाचे अधिकारी कार्यरत आहेत हे लोकांना समजेनासे झाले आहे.जलसंपदा आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अखत्यारीत असलेल्या खात्यातील विभागांतर्गत हे काम आहे.त्यांनी तातडीने सुचना देउन हे काम पूर्ण करावे असे या भागातील सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

























