Home महाराष्ट्र सोयगावमध्ये भाजपचा विजयोत्सव उत्साहात साजरा

सोयगावमध्ये भाजपचा विजयोत्सव उत्साहात साजरा

सोयगावमध्ये भाजपचा विजयोत्सव उत्साहात साजरा

 

 

 

सोयगाव, दत्तात्रय काटोले

सोयगाव : पश्चिम बंगाल, आसाम व पुड्डुचेरी येथील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा – एनडीए आघाडीला मिळालेल्या यशाबद्दल सोयगाव शहर भाजपच्या वतीने विजयोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मतदारांनी दिलेल्या कौलामुळे हा ऐतिहासिक विजय शक्य झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.

या कार्यक्रमास शहराध्यक्ष मंगेश सोहनी, वसंत आप्पा बनकर, राजेंद्र जावळे, सुनील गावंडे, प्रमोद पाटील, मयूर मनगटे, बाळु शेठ झवर, सुनील ठोंबरे, बापू काळे, नाना जाधव, हरसिंग परदेशी, राजेंद्र पाटील तसेच भाजपचे इतर नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी आगामी काळातही पक्षाची ताकद वाढविण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

 

Don`t copy text!