विविध स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती यशस्वीतांचा एक मे रोजी भव्य सत्कार सोहळा
पाचोरा -भडगाव तालुक्याचे लोकप्रियआमदार किशोर आप्पा पाटील व पाचोरा भडगाव शिवसेना युवा सेना यांच्या पुढाकारातून विविध
स्पर्धा परीक्षेत व पोलीस भरतीत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभात यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा सत्कार समारंभ
शुक्रवार १ मे २०२६ रोजी
सकाळी १० वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय , छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा येथे माननीय आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमा प्रमुख मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले असणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी
श्री भूषणअहिरे( प्रांताधिकारी पाचोरा), श्री बापू रोहम (पोलीस उप अधीक्षक पाचोरा), श्री विजय बनसोडे( तहसीलदार पाचोरा), श्री राहुल पवार
(पोलीस निरीक्षक ), श्री मंगेश देवरे (मुख्याधिकारी) हे असणार आहेत.
सौ सुनीताताई पाटील
(*नगराध्यक्ष* पाचोरा), श्री रावसाहेब पाटील
(जिल्हा अध्यक्ष शिवसेना), श्री गणेश पाटील
(सभापती
कृषी उत्पन्न बाजार समिती) , श्री सुमित पाटील
(गटनेते पाचोरा नगरपालिका) ,श्री किशोर बारावकर(उपनगराध्यक्ष) लोकनियुक्त नगराध्यक्षा न.पा.पाचोरा, श्री. राजेंद्र पाटील,.श्री. विनोद तावडे,
श्री. समाधान पाटील,श्री. सुधाकर पाटील,श्री. सुमित सावंत,श्री. भोला पाटील,श्री. अजय चौधरी,श्री. नंदकिशोर देवरे यांची या सत्कार समारंभास प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमास शिक्षण प्रेमी, स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी , यशस्वी विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांकडून व संयोजक सुधीर पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे . संपर्कासाठी 9921211677 या क्रमांकावर संपर्क करावा.























