गो.से.हायस्कूलच्या पर्यवेक्षकपदी श्री. आर. बी. तडवी सर यांची नियुक्ती

गो.से.हायस्कूलच्या पर्यवेक्षकपदी श्री. आर. बी. तडवी सर यांची नियुक्ती

 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे ज्येष्ठ शिक्षक श्री.आर.बी. तडवी सर यांना मुख्याध्यापक श्री.एन. आर.ठाकरे सर यांच्या हस्ते पर्यवेक्षक पदाचा नियुक्ती आदेश देण्यात आला.

. याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक श्री.आर.एल. पाटील सर, पर्यवेक्षक श्री.ए.बी. अहिरे सर, सौ.ए.आर.गोहिल मॅडम, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.एम.टी.कौंडिण्य सर, कार्यालयीन प्रमुख श्री.अजय सिनकर व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.

. त्यांच्या या नियुक्ती बद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.भाऊसो.श्री. दिलीप वाघ, चेअरमन मा. नानासो.श्री.संजयजी वाघ, मानद सचिव मा.दादासो. ऍड.श्री.महेश देशमुख, व्हा.चेअरमन मा. नानासो.श्री.व्ही.टी.जोशी, शालेय समिती चेअरमन मा.दादासो. श्री.खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन मा. अण्णासो.श्री.वासुदेव महाजन यांनी अभिनंदन केले आहे..