Home जळगाव ‘​देशाच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हीच काळाची गरज :- डॉ....

‘​देशाच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हीच काळाची गरज :- डॉ. उत्तम सोनकांबळे

‘​देशाच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हीच काळाची गरज :- डॉ. उत्तम सोनकांबळे

 

चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर अभ्यास व संशोधन केंद्रातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्ताने डॉ. उत्तम सोनकांबळे यांच्या व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला  राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे या उपस्थित होत्या तसेच याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य प्रा. डॉ. आर.एम. बागुल, उपप्राचार्य प्रा. डॉ. के.एन.सोनवणे, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए.बी. सूर्यवंशी,  समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ,  प्रमुख वक्ते डॉ. उत्तम सोनकांबळे, उपप्राचार्य पी. एस.पाडवी, पर्यवेक्षक ए.एन.बोरसे, रजिस्ट्रार  डी. एम.पाटील व डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर अभ्यास व संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. डी.पी.सपकाळे आदि मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. के.डी. गायकवाड तसेच व्ही.डी.शिंदे यांनी बुद्ध वंदना सादर केली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर अभ्यास व संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. डी.पी. सपकाळे यांनी केले.यावेळी त्यांनी आपल्या प्रास्ताविकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास व संशोधन केंद्राची वाटचाल व कार्यक्रम आयोजनामधील भूमिका स्पष्ट केली.

याप्रसंगी प्रमुख वक्ते प्रा.डॉ. उत्तम सोनकांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटले की, ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अवलंबलेली गौतम बुद्ध यांची पंचशील तत्वे म्हणजे मानव बनविण्याची प्रक्रिया होय. विद्यार्थ्यांनी चिकित्सक बुद्धीने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करून व संशोधक वृत्तीने आपले मत मांडावे, हे बाबासाहेबांचे स्वप्न होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देशाला पुढे नेणारे असून प्रत्येक घटकाला शिक्षण घेण्याचा नैसर्गिक अधिकार आहे. शिक्षणामुळेच समाजाची प्रगती होते. समाजातील जातीयता, अस्पृश्यता, विषमता नष्ट करण्यासाठी आजच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची नितांत आवश्यकता आहे. शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांच्या विकासाला पोषक बनविणारी हवी. शिक्षण समाजाचे व सर्व समस्यांचे निराकरण करणारे हवे. शिक्षणामुळेच शाश्वत विकास व सक्षमीकरण करता येते हे बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून सुजाण, परिवर्तनशील, सुसंस्कारी, विचारी विद्यार्थी घडवणे ही काळाची गरज आहे’.

यावेळी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे म्हणाल्या की, ‘शांतता व सकारात्मक कृतीला चालना देण्याचे कार्य पंचशील तत्त्वांच्या माध्यमातून मिळते. भारतीय संस्कृती अंधारातून प्रकाशाकडे व सत्कृत्याकडे नेणारी आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे सामाजिक समता आणि बंधुतेचा उत्सव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी प्राध्यापकांनी अद्ययावत ज्ञानाचा वापर करावा. समाज वाचल्याने खरे ज्ञान मिळते म्हणूनच सामाजिक परिवर्तनासाठी समाज निरीक्षण व समाज वाचण्याची नितांत आवश्यकता आहे.’

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही.डी. शिंदे यांनी केले तर आभार विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. डी. डी. कर्दपवार यांनी मानले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी बंधू -भगिनी उपस्थित होते.

Don`t copy text!