Home महाराष्ट्र कोपरे येथे नामांकित पैलवानांच्या कुस्त्याने मळगंगा देवी यात्रा महोत्सवाचा समारोप

कोपरे येथे नामांकित पैलवानांच्या कुस्त्याने मळगंगा देवी यात्रा महोत्सवाचा समारोप

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

कोपरे येथे नामांकित पैलवानांच्या कुस्त्याने मळगंगा देवी यात्रा महोत्सवाचा समारोप

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मळगंगा देवीला हळद लावून देवीच्या मंदिरा समोर काठी उभारली गेली होती. त्याचवेळी गावातील सर्व सुवासिनी,माता भगिनी,यांचे उपवास व अनुष्ठान सुरू झाले होते.अनेक भाविकांनी नवसाच्या पंगतीने फराळाचे वाटप केले.देवीच्या मंदिरात जागरण-गोंधळ आयोजन करण्यात येतो.चैत्र पौर्णिमे नंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोपरे येथिल मळगंगा देवीच्या यात्रा महोत्सवास प्रारंभ झाला.पैठणहुन वाजत गाजत आणलेल्या गंगेच्या कावडीच्या पाण्याने देवीला भल्या पहाटे जलाभिषेक करण्यात आला.सायंकाळी साडेचार वाजता संपूर्ण गावातील माता भगिनींनी देवीला वाजत गाजत पुरणपोळीचा महानैवेद्य अर्पण केला.यावेळी सासरी गेलेल्या अनेक सुवासीणी आपल्या सर्व कुटुंबीयांना सोबत घेऊन माहेरच्या मळगंगा देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या.रात्री साडेनउ वाजता तोफांच्या सलामीत आणि फटाक्यांच्या व शोभेच्या दारूच्या आतषबाजीत मळगंगा देवीच्या काठीची,पालखीची छबीना मिरवणूक काढण्यात आली होती.छबीना मिरवणूकीत गैर प्रकार होवूनये म्हणून काही समाज कंटकांना आवर घालण्या साठी पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांच्या मार्गदर्शना खाली पाथर्डी पोलिसांचा व्हॅन द्वारे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.बुधवारी सकाळी हनुमान मंदिरा समोर कलाकारांचा हजेरी कार्यक्रम संपन्न झाला. कोपरे ग्रामस्थ आणि यात्रा पंच कमेटीच्या वतीने सायंकाळी साडेचार वाजता जिल्ह्यातील नामवंत पैलवानांच्या कुस्त्यांचा जंगी हंगामा भरवण्यात आला होता.किरकोळ बाचाबाची वगळता हंगामा शांततेत संपन्न झाला.या दिवशी मळगंगा देवीच्या मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पुढील वर्षी देवीच्या मंदिर परिसरातच कुस्त्यांचा फड भरवण्या साठी नविन कुस्त्यांचे मैदान तयार करण्यात येणार आहे.असे यात्रा कमेटीच्या वतीने घोषित करण्यात आले.एकंदरीत खेळीमेळीच्या वातावरणात मळगंगा देवी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Don`t copy text!