सौ.सावित्रीबाई परशराम शिंदे,प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

आज सौ.सावित्रीबाई परशराम शिंदे,प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

आज २०२३-२४ या नवीन शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली. त्यानिमित्त शाळेत सकाळी ७.३० वा. प्रवेशोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी माणिकराजे ट्रस्टचे विश्वस्थ मा.प्रा.रविंद्र चव्हाण सर, प्रमुख अतिथी म्हणून गिरणाई शिक्षण संस्थेचे सहसचिव मा.प्रा. शिवाजी शिंदे सर, तसेच पालकांचे प्रतिनिधी श्री. तुषार येवले, श्री.गणेश सिनकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नवागतांचे स्वागत व पुस्तक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक,श्री.सु.ना.पाटील सर, सुत्रसंचालन श्रीम. सरोज बावा मॅम यांनी केले.