Home जळगाव चोपडा महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सची भरारी— स्वप्न साकार करत कॅडेट परेश अहिरराव बनले...

चोपडा महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सची भरारी— स्वप्न साकार करत कॅडेट परेश अहिरराव बनले भारतीय सैन्यात अधिकारी

चोपडा महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सची भरारी— स्वप्न साकार करत कॅडेट परेश अहिरराव बनले भारतीय सैन्यात अधिकारी

 

चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील एनसीसी विभागातील कॅडेट परेश सुभाष अहिरराव या विद्यार्थ्याने नुकतेच भारतीय सैन्य दलात अधिकारी पदाकरिता चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी येथून प्रशिक्षण पूर्ण केले. लेफ्टनंट परेश अहिरराव यांच्या या उज्वल यशामुळे संपूर्ण चोपडा शहरात व महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. परेश अहिरराव याने चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश पाटील महाविद्यालयातून तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली आहे. वर्दीतील स्वप्न साकार करत त्याने केवळ आपल्या कुटुंबाचे नव्हे तर महाविद्यालयाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. लेफ्टनंट परेश अहिराव यांचा सत्कार समारंभ नुकताच महाविद्यालयात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अँड. संदीप सुरेश पाटील तसेच प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप्टन प्रा. डॉ. बी.एम सपकाळ यांनी केले. त्यांच्या प्रास्ताविकेत त्यांनी महाविद्यालयातील एनसीसी विभागाची मागील काही वर्षाची यशवंत कॅडेट्सची कामगिरी विशद केली.

या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एम. बागुल, उपप्राचार्य प्रा. डॉ.ए. बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, रजिस्ट्रार श्री. डी. एम. पाटील, डॉ. सी. आर. देवरे, श्री. पी आय. जैन, श्री. चेतन बाविस्कर आदि उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी लेफ्टनंट परेश सुभाष अहिरराव व त्यांचे वडील सुभाष अहिरराव यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी लेफ्टनंट परेश अहिराव यांनी मनोगत व्यक्त केले व महाविद्यालयाने वेळोवेळी केलेली मार्गदर्शन केल्याबद्दल आभार व्यक्त केले.त्यांच्या या यशामध्ये महाविद्यालयातील एनसीसी विभागातर्फे घेतलेल्या प्रशिक्षणाचा मोठा वाटा आहे असे नमूद केले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अँड संदीप सुरेश पाटील यांनी लेफ्टनंट परेश अहिराव यांचे अभिनंदन केले व त्यांचे यश हे संपूर्ण चोपडा शहराला व महाविद्यालयाला भूषणावह आहे, असे नमूद केले. लेफ्टनंट परेश हे आता भारतीय सैन्य सैन्यात अधिकारी म्हणून देश सेवेची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळतील व सैन्य दलात उच्च अधिकारी पदापर्यंत पोहोचतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

संस्थेचे अँड संदीप पाटील यांनी यावेळी बोलताना उपस्थित सर्व एनसीसी कॅडेट कडून अशीच सैन्य दलात यशप्राप्त करून महाविद्यालयाचे नाव उंचवावे अशी अपेक्षा व्यक्त केली व सर्व एनसीसी कॅडेट्सना पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या.

Don`t copy text!