Home महाराष्ट्र एका रेशन कार्डावर मिळणार तिन लिटर रॉकेल,केंद्र सरकारची घोषणा,गॅस टंचाईवर काढला जालिम...

एका रेशन कार्डावर मिळणार तिन लिटर रॉकेल,केंद्र सरकारची घोषणा,गॅस टंचाईवर काढला जालिम उपाय

एका रेशन कार्डावर मिळणार तिन लिटर रॉकेल,केंद्र सरकारची घोषणा,गॅस टंचाईवर काढला जालिम उपाय

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

अमेरिका आणि इराण युद्धाचे परिणाम संपूर्ण जगा सह भारताला ही भोगावे लागत आहेत.या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत भयानक उलथा पालथ झाली असल्याचे दिसून येत आहे.केंद्र सरकारने व्यवसायीक दुकानदारांचा गॅस पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे व्यावसायिक वर्गात प्रचंड प्रमाणात खळबळ उडाली आहे.गॅसटंचाई मुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत.अनेकांचेव्यवसाय बंद झाले आहेत त्या मुळे सर्व सामान्य लोकांना जिवन जगणे अवघड होऊन बसले आहे.म्हणून गॅस टंचाईवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने अत्यंत विचारपूर्वक आणि घाईघाईने हा जालिम उपाय शोधून काढला आहे.इंधन पुरवठा करणाऱ्या तिनं सरकारी कंपन्या कडून एकुण ३७ लाख ४४ हजार लिटर रॉकेल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.प्रत्येक रेशन कार्डावर किमान तिन लिटर रॉकेल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.यामुळे सामान्य लोकांना दिलासा मिळणार आहे.अडगळीला पडलेले स्टोव्ह आता पुन्हा एकदा नव्याने पेटणार आहेत. तर काहींना नवीन स्टोव्ह घ्यावे लागणार आहेत.केंद्र सरकारच्या या निर्णयाचे ग्रामीण भागात जोरदार स्वागत होत आहे. ऑनलाईन नोंदणी असल्याने आता राॅकेल वाटपातील होणारे गैरप्रकार बंद होणार आहेत.तसेच इंधनाच्या अनावश्यक वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.व्यापारी वर्गाला साठेबाजी करण्यासाठी वाव मिळू नये म्हणून अनेक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्या मार्फत प्रसार माध्यमांना हाताशी धरून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. इंधन टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने अतिशय कडेकोट बंदोबस्त केला आहे. नागरीकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवूनये असे सरकार कडून आवाहन करण्यात येत आहे.

Don`t copy text!