Home महाराष्ट्र सोयगाव : नेकी फाउंडेशनतर्फे ईद मिलन सोहळा उत्साहात 

सोयगाव : नेकी फाउंडेशनतर्फे ईद मिलन सोहळा उत्साहात 

सोयगाव : नेकी फाउंडेशनतर्फे ईद मिलन सोहळा उत्साहात

 

 

 

सोयगाव

पवित्र रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर आपापसातील प्रेम, एकोपा आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने नेकी फाउंडेशन, सोयगाव यांच्या वतीने ‘ईद मिलन सोहळा’ कार्यक्रम सोमवारी सिद्दिकी मस्जिद परिसरात

मोठ्या उत्साहात घेण्यात आला.

या सोहळ्यास सोयगाव शहरातील विविध समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला असून, सर्वांनी प्रेम आणि बंधुभाव कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नेकी फाउंडेशनचे अध्यक्ष रसूल शेख, उपाध्यक्ष शेख वसीम, सचिव सईद देशमुख, सहसचिव इम्रान देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम अत्यंत सुरळीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या ईद मिलन सोहळ्यामुळे सोयगावात सामाजिक सलोखा अधिक दृढ झाला असून, नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Don`t copy text!