जिल्हा परिषद प्रशाला, सोयगाव येथे करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
सोयगाव | प्रतिनिधी
दत्तात्रय काटोले
कुरुक्षेत्र करिअर अकॅडमी, सोयगाव व जिल्हा परिषद प्रशाला, सोयगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “दहावी-बारावीनंतर काय?” या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचा उत्साहात समारोप झाला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयोजित या उपक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमात भास्कर चौधरी सर, सचिन ढगे सर व सीमा राऊत मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी दहावी व बारावीनंतर उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक शाखा, स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच करिअरच्या विविध संधींबाबत सविस्तर माहिती दिली.
मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करून योग्य करिअर निवडीसाठी आत्मविश्वास निर्माण केला. “योग्य नियोजन, सातत्यपूर्ण मेहनत आणि चिकाटी यांच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी यावेळी दिला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये करिअरविषयी जागरूकता निर्माण झाली असून त्यांच्या भविष्यासाठी योग्य दिशा मिळण्यास मदत झाली आहे. कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक दादाराव राठोड सर तसेच सुकदेव पाटील सर, वैजनाथ सावळे सर, दौलतसिंग परदेशी सर,शिवाजी नवले सर, राजेंद्र उंबरकर सर, शिवराम आगे सर, विद्याधर बागुल सर, जयश्री वाघ मॅडम व संगीता सोनवणे मॅडम यांचे अनमोल सहकार्य लाभले.























