Home महाराष्ट्र शिवजयंतीच्या पावन मुहूर्तावर जन्मलेल्या बाळाचे ‘शिवराज’ असे नामकरण; पारध येथे भक्तिमय वातावरणात...

शिवजयंतीच्या पावन मुहूर्तावर जन्मलेल्या बाळाचे ‘शिवराज’ असे नामकरण; पारध येथे भक्तिमय वातावरणात सोहळा संपन्न

शिवजयंतीच्या पावन मुहूर्तावर जन्मलेल्या बाळाचे ‘शिवराज’ असे नामकरण; पारध येथे भक्तिमय वातावरणात सोहळा संपन्न

 

पारध (प्रतिनिधी – महेंद्र बेराड): छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पावन आणि मंगलमय शुभमुहूर्तावर हभप अंबादास महाराज लोखंडे यांच्या घरी पुत्ररत्नाचा जन्म झाला. शिवजयंतीच्या शुभदिनी जन्मलेल्या या बाळाचा जन्म जणू शिवकृपा आणि ईश्वराचा आशीर्वाद मानत पारध येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात बाळाचे नाव ‘शिवराज’ असे ठेवण्यात आले.

 

या निमित्ताने हरिनामाच्या गजरात आणि भक्तिरसाने भारलेल्या वातावरणात कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हभप विष्णू महाराज सास्ते यांची हरिभक्तीमय कीर्तन सेवा यावेळी पार पडली. हा कीर्तन सोहळा हभप अंबादास महाराज लोखंडे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. कीर्तनकार विष्णू महाराज सास्ते यांनी आपल्या प्रभावी वाणीमधून हरिभक्तीचा संदेश देत उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.

 

या पवित्र कीर्तन सोहळ्यास गोपाल महाराज लोखंडे तसेच तालुक्यातील अनेक महाराज मंडळी उपस्थित होती. याशिवाय माजी पंचायत समिती सभापती परमेश्वर पाटील लोखंडे, माजी सरपंच परमेश्वर पाटील लोखंडे, सांडू पाटील लोखंडे, नितीन लोखंडे, विठ्ठल लोखंडे, दत्ता लोखंडे, सागर देशमुख, महेंद्र बेराड सर आदी मान्यवरांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच पारध गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

शिवजयंतीच्या पावन दिवशी जन्मलेले हे बाळ भविष्यात शिवभक्ती, धर्मनिष्ठा आणि समाजसेवेचा वारसा पुढे नेईल, असा आशावाद उपस्थितांनी व्यक्त केला. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या नामकरण सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात आनंद आणि आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Don`t copy text!