गलवाड्यात शिवजयंती उत्साहात; ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष…..
सोयगाव, दि. २३ (प्रतिनिधी) : तालुक्यातील गलवाडा येथे बुधवारी (दि. २२) छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शिवाजीनगर (प्लॉट) येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. ढोल-ताशांच्या गजरात, नाचत-गात असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत ही मिरवणूक गलवाडा गावात पोहोचली. गावात सर्वत्र जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिवजयंतीनिमित्त शिवव्याख्याने आयोजित करण्यात आली होती. तसेच लहान मुलामुलींनी आकर्षक देखावे सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमामुळे गावात उत्साह आणि ऐतिहासिक अभिमानाची भावना जागृत झाली.
यावेळी अनिल इंगळे, आनंदा इंगळे, जीवन पाटील, किरण इंगळे , सुनील सैदाणे, पंजाबराव कुनगर, दीपक सोनवणे, अक्षय औरंगे, ओम इंगळे, रमेश चक्के, यश देशमुख, ऋषिकेश देशमुख, निलेश इंगळे, रणवीर इंगळे, शुभम पाटील, गोपाल पाटील, रोहित देशमुख, विजय सोनवणे, योगेश इंगळे, आशुतोष पाटील, गोपाल मंडवे, विकास मंडवे, शिवानंद औरंगे, सुमित खीरडकर, ललित इंगळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























