हनुमान टाकळीच्या वै.परम पूज्य माधव स्वामींनी क्षेत्र संन्यास घेतला होता : ह.भ.प. म्हस्के महाराज

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
श्री क्षेत्र हनुमान टाकळीचे वै.परमपुज्य माधव स्वामींनी क्षेत्र संन्यास घेतला होता असे गौरवोद्गार नेवासा येथील ज्ञानेश्वर महाराज संस्थान चे महंत ह.भ.प.देविदास महाराज म्हस्के यांनी काढले.ते अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील गरडवाडी येथे झालेल्या ज्ञानेश्वर पारायण सोहळ्यातील काल्याच्या किर्तना प्रसंगी बोलत होते. आपल्या गावाची शिव सोडून जायचे नाही हा त्यांचा संकल्प होता आणि त्यांनी तो आयुष्यभर जपला होता.म्हस्के महाराज पुढे म्हणाले की एखादा जीव आपल्या जीवनात जो पर्यंत देवाला प्राप्त करीत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाचे सार्थक होत नाही.देव मिळवल्या शिवाय आपले जीवन ही धंन्य होत नाही. लोकांना आपल्या जीवापेक्षा धन द्रव्य जास्त आवडते पण संतांनी देवालाच धन मानले.म्हणून देव संतांना आवडतो.ज्ञानी माणसाला परब्रम्ह आवडते.देवाच्या भक्तीचा आनंद घेण्यासाठी अंतःकरणाचे घर हे शुद्ध असावे लागते.देवाने जर घरात येऊन रहावे असे वाटत असेल तर ते घर शुद्ध सात्विक आणि निर्मळ असावे लागते.आपली भक्ती ही गरजेपोटी असते तर संतांची भक्ती ही आवडी पोटी असते.संत हे परमात्म्याशी एकरूप झालेले असतात.कृष्णा पेक्षा कोणतेही तत्त्वज्ञान या जगात फार मोठे आहे हे मी मानत नाही. देविदास महाराज म्हस्के यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.या अखंड हरिनाम सप्ताहात त्रिवेदानंद सरस्वती महाराज,गणेश चेडे महाराज, रामकृष्ण महाराज आव्हाड, संभाजी महाराज पवार,ऋषिकेश महाराज थोरात,राम महाराज झिंजुर्के,रामगीरी महाराज येळीकर यांची ही किर्तने झाली.या काल्याच्या किर्तना प्रसंगी कांता देवढे, जालिंदर गरड, अप्पासाहेब मोरे,मोहन गरड, जनार्दन खेडकर, बबनराव देशमुख, सोमनाथ पाटेकर, कोल्हे महाराज, विलास जावळे महाराज,उद्धव वाघमारे,विठ्ठल आव्हाड, आसाराम आव्हाड,एकनाथ वाघमारे,योगेश गरड महाराज, बाळासाहेब देशमुख,गंगाधर गरड,शिवाजीराव गरड,बापुसाहेब पाटेकर हे आवर्जून उपस्थित होते. हा पारायण सोहळा यशस्वी करण्यासाठी गरडवाडी ग्रामस्थ आणि भजनी मंडळ व सप्ताह कमेटीने विषेश परीश्रम घेतले.प्रमिला मंडलेचा यांच्या काल्याच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता झाली. गावातील आणि पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.























