सोयगाव नगरीतील सर्व ग्रामस्थ व शिवभक्तांसाठी अत्यंत आनंदाची व पवित्र बातमी

सोयगाव, दत्तात्रय काटोले
महाशिवरात्री निमित्त नारळीबाग, नाळे विभाग, सोयगाव येथे भव्य जाहीर कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मंगल प्रसंगी ह.भ.प. देव गोपाल शास्त्री महाराज यांचे भावस्पर्शी व प्रबोधनात्मक कीर्तन आज रात्री ८.३० वाजता महादेव मंदिर सोयगाव येथे संपन्न होणार आहे.
संध्याकाळी ५ वाजल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून महाप्रसादानंतर कीर्तनास प्रारंभ होईल. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन जय भोले मित्र मंडळ, नारळीबाग यांनी भक्तिभावाने केले आहे.
महाशिवरात्र म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर आत्मशुद्धी, भक्ती आणि श्रद्धेचा पवित्र संगम आहे. भोलेनाथाच्या चरणी मन अर्पण करण्याचा हा सुवर्णक्षण आहे.
“ॐ नमः शिवाय” या पंचाक्षरी मंत्राचा जप मनातील सर्व क्लेश दूर करून जीवनात शांतता व समाधान देतो.
भगवान शंकर हे दयाळू, करुणामूर्ती आणि भक्तांच्या हाकेला धावून येणारे देव आहेत.
“त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥”
या पवित्र मंत्रोच्चारात व कीर्तनाच्या रसधारेत सहभागी होऊन आपले जीवन अधिक मंगलमय व आध्यात्मिक बनवूया.
तरी सर्व ग्रामस्थ, शिवभक्त व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे नम्र आवाहन आयोजकांकडून जय भोले मित्र मंडळ नारळीबाग सोयगाव करण्यात येत आहे.
























